डॉ.तांबोळी बंन्धूची चांगली आरोग्य सेवा दिली ; आ.विक्रमसिंह सांवत | शिबिराचा साडेतीनशे रुग्णांनी घेतला लाभ

0
Rate Card
जत : जत‌ येथील डॉ.तांबोळी बंधूंनी रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचे काम केले आहे,या आरोग्य शिबिराचा रुग्णांना चांगला फायदा होईल असे प्रतिपादन आ.विक्रमसिंह सावंत यांनी केले. जत शहरातील डॉ.मुनिर तांबोळी मेमोरियल आणि वेलनेस मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, दातांचे क्लिनिक व डॉ.मकसूद तांबोळी यांच्या ऑथेपिडिक हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ.विक्रमसिंह सावंत बोलत होते.

यावेळी डॉ. मकसूद तांबोळी, डॉ.एजाज तांबोळी, मुदस्सर तांबोळी,विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.युवराज निकम, फिरोज नदाफ, संतोष भोसले, सचिन पोदार माजी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई पाचापुरे,आयुब नदाफ, डॉ. प्रशांत चिक्कोडी,डॉ. सुनील पुदाले, अमिन शेख , संदीप जेऊरकर, गणेश गिडे,बी. ए. शेख ,गौस इंडीकर, राजु नदाफ, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते.
आमदार सावंत पुढे म्हणाले की,जत तालुका हा आता आरोग्याची पंढरी म्हणून ओळखला जात असून, या आधी रुग्णाना एखादा गंभीर आजार झाल्यास सांगली-मिरज येथे जावे लागत होते.

 

 

पण आता जत तालुक्यात रुग्णांची सोय होत असून ही कौतुकास्पद बाब आहे. डॉ. मुनिर तांबोळी यांनी ऑर्थोपेडिकच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सेवा दिली आहे. या मोफत शिबिराचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.तांबोळी बंधूंनी अशीच यापुढेही दर्जेदार सेवा रुग्णांना द्यावी.विविध आजारांवरचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन रुग्णांची चांगली सोय केल्याचेही आ.सावंत यांनी म्हणाले.दरम्यान आरोग्य शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला,साडेतीनशे रुग्णांवर उपचार करण्यात आले, औषधेही वाटण्यात आली.
जत शहरातील डॉ.मुनिर तांबोळी मेमोरियल आणि वेलनेस मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.