जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदल चर्चेत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद जत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जतच्या कर्तव्यदक्ष उच्च शिक्षित सदस्या सौ.स्नेहलता जाधव यांचे नाव सध्या अध्यक्षपदासाठी समोर येत आहे.जत तालुक्यात तिसऱ्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी भाजपा नेत्यानी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आल्यानंतर प्रथम अध्यक्षपद पलूस कडेगाव, दुसऱ्या वेळी मिरज तालुक्याला मिळाले आहे,विशेष म्हणजे उपाध्यक्ष पदही सध्या मिरज तालुक्यात आहे.यापुर्वी महत्वाचे अर्थ व बांधकाम सभापतीही मिरज तालुक्याला मिळालेले आहे.खानापूर-आटपाडीला प्रांरभी उपाध्यक्ष, समाजकल्याण सभापती पद मिळाले होते.तासगाव-कवटेमहांकाळला सध्या समाजकल्याण,शिक्षण व आरोग्य सभापतीपद आहे.त्यामुळे जत तालुक्याची सध्या अध्यक्ष पदासाठी दावेदारी आहे.तालुक्यात भाजपाचे सहा सदस्य असलेल्या जतच्या भाजपा नेत्यांनी अध्यक्ष पदाची मागणी समोर केली आहे.
जिल्हा परिषदेत सध्या पदाधिकारी बदलाचे हालचाली गतीमान झाल्याने जतला अध्यक्ष पद मिळावे यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे.
जत तालुक्यातील भाजपा सदस्या सौ.स्नेहलता जाधव याचे नाव सध्या चर्चेत आहेत.शेगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या सौ.जाधव यांनी प्रभावी काम केले आहे.मोठ्या प्रमाणात तालुक्यात निधी खेचून आणला आहे. उच्चशिक्षित सभागृहात तालुक्याचे प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या सौ.जाधव यांच्या नावाला मोठी पंसती आहे.तालुक्यातील भाजपा नेत्याचा त्यांना पांठिबा आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी जत तालुक्याचा प्राधान्याने विचार करावा,अशी मागणी होत आहे.