जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.त्यांचे उद्घाटन गुरुवार दि.14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9:00 पासून मौजे पांडोझरी येथून होणार आहे.येथे होणाऱ्या शासनाच्या सर्व विभागाच्या मेळाव्याचा तिकोंडी सर्कल मधील येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या मेळाव्यात महसूल विभाग ; विविध प्रकारचे दाखले देणे,उदा. जातीचे, अदिवास, उत्पन्न, नॉन क्रिमिलिअर,शेतकरी दाखला,7/12,8 अ,फेरफार,आधार कार्ड, पॅनकार्ड, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना अंपग पेन्शन योजना, दूबार रेशनकार्ड, जेष्ठ नागरीक कार्ड, मतदार नोंदणी, रेशनकार्ड नाव कमी करणे/वाढविणे, अन्नसुरक्षा योजना,सहा.पोलीस निरीक्षक उमदी ; ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे/किट वाटप करणे, प्रशस्तीपत्रक वाटप करणे,
सहा.अभियंता, विज वितरण कंपनी संख ; वीज मागणी अर्ज स्विकारणे,विजबिलाबाबत तक्रारीचे जागेवर निपटारा करणे,शाखा अधिकारी,बँक ऑफ इंडीया को.बोबलाद जि.म.सह. बँक संख जनधन योजना शाळेतील मुलांचे शून्य बॅलन्सवर खाते उघडणे, कर्जाबाबत माहिती देणे, एटीएम कार्ड देणे विद्यार्थी खाते उघडणे,
आगार व्यवस्थापक परीवहन विभाग ; ग्रामसंपर्क योजना, मासिक पास, मासिक वार्षीक,सवलत कार्ड,प्रासंगिक करार, पिकअप शेड मागणी नोंदविणे,गावासाठी स्वंतत्र गाडी सोय मागणी करणे,तालुका कृषी अधिकारी संख ; एम.आर.ई.जी.एस.वैयक्तीक लाभाच्या योजना,अपघात योजना फॉर्म भरणे व माहिती देणे,पशूवैद्यकीय अधिकारी जत ;पशूधन विमा, चारा बि-बियाणे वाटप, कोंबडी पिल्लू /अंडी वाटप,
तालुका आरोग्य अधिकारी जत ;
कोविड १९ बाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, या आजाराचा प्रसार रोखणे व लसीकरण बाबत माहिती देणे.कोविड १९ लसीचे वाटप करणे. मोफत डोळे तपासणी शिबीर. रक्ततपासणी, रक्तदान शिबीर, 1 दिवस बाहय रुग्ण,तपासणी शिबीर, नाक, कान, डोळे तपासणी शिबीर राजीव गांधी जीवनदायी योजन,आरोग्य विमा योजना बाबत,गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती जत ; शाळेतील विविध योजनाची माहिती देणे मागासवर्गीय मुलांना जातीचे दाखले देणे,
मंडळ अधिकारी तिकोंडी ; त.र.न.केसेस/चौकशी अहवाल व सर्व प्रकारचे कामकाज नियोजन व बैठक व्यवस्था करणे, तिकोंडी मंडळातील सर्व तलाठी ; आपल्या गावातील 7/12, 8अ फेरफार उतारे देणे व तलाठी यांचेशी संबंधित सर्व प्रकारचे काम करणे,अशी कामे एकाच ठिकाणी होणार आहेत.त्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.