उमदी जवळील बुलेरो-दुचाकी अपघातात एकजण ठार,तिघे जखमी

0
उमदी,संकेत टाइम्स : उमदी (ता. जत) येथे कोडग वस्तीजवळ दोन मोटरसायकल स्वरांना पाठीमागून वेगाने आलेल्या बोलोरा गाडीने धडक दिल्याने एक ठार झाला आहे व तिघेजण जखमी झाले आहेत. विराज विनायक कोडग (वय ९,रा.उमदी ) असे ठार झालेल्या मुलांचे नाव आहे.विनायक ज्ञानदेव कोडग, शिवाजी लक्ष्मण कोडग व स्नेहल शिवाजी कोडग असे तिघेजण अपघातात जखमी झाले आहेत.

ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेजबाबदार निष्काळजीपणे भरधाव गाडी चालविल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलोरो चालक महादेव शिवाप्पा लोणी (रा. उमदी) यांच्यावर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक कोडग हे मुलगा विराज,तर शिवाजी कोडग हे मुलगी स्नेहल असे दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून उमदीतून मोटरसायकलवरून घराकडे जात होते. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन्ही मोटरसायकली कोडग वस्ती जवळच्या गतिरोधक जवळ आल्या होत्या.यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने बोलोरा (एमएच १०,बीएम ५९८१)या गाडीने उडविले.बोलोरा गाडी चालक महादेव लोणी यांचे गाडीच्या वेगावर नियंत्रण नव्हते.

 

 

 

यामुळे बोलोराने दोन्ही मोटारसायकला धडक दिली.यातील चौघेही रस्त्यावर आपडले. यातील विराज कोडग यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती व विनायक कोडग,शिवाजी कोडग व स्नेहल ही जखमी झाले.विराज ला गंभीर दुखापत झाल्याने प्रथम माडग्याळ नंतर मिरज‌ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेहत असताना त्याचा मृत्यू झाला.

 

 

उपचार घेऊन आल्यानंतर विनायक कोडग यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे, अधिक तपास उमदी पोलीस करत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.