बागेवाडीतील वृद्ध महिलेचा आत्मदहनाचा इशारा

0
1
जत,संकेत टाइम्स : उपविभागीय  अधिकारी यांनी आदेश देऊनही मुलीनी पोटगी व जमिन न दिल्याबद्दल बागेवाडी ता.जत येथील वृद्धा श्रीमती रुक्मिणी उर्फ रमाबाई मारुती चव्हाण ७ दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन,आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जतचे तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे,दि मेंटेनन्स अँड वेलेफर ऑफ पॅरेंटस अँन्ड सिनियर्स अँक्ट २००७ चे कलम १६ अन्वये दाखल केलेल्या अर्जावर उपविभागीय अधिकारी, जत व जिल्हाधिकारी सांगली यांनी अर्ज मंजूर करून वृध्दा रुक्मिणी यांच्या मुली सौ.वंदना सुळे २००० आणि सौ.नंदा जाधव ३००० आणि मोजे बागेवाडी येथील गट नं. १११ मधील पूर्व बाजूचे क्षेत्र १ हे.१० आर जमिन वहिवाटीस व मशागतीस अडथळा करायचा नाही,असा आदेश दिलेला आहे.
परंतु आजअखेर सौ.नंदा दिलीप जाधव,दिलीप शंकर जाधव,शंकर ईश्वरा जाधव,सोन्या उर्फ प्रविण दिलीप जाधव हे व्यक्ती तहसिलदार, जत, उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी जत, यांचेवरती उपोषण व आत्महत्येची भिती दाखवून माझी पोटगी व जमिन मला आजअखेर दिलेली नाही,पोलिस अधिक्षक सांगली यांच्या आदेशाप्रमाणे मी पैसे भरून बंदोबस्त घेतला होता.त्यावेळी मशागत करत असताना, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित नाहीत व सुट्टी दिवशी मशागत करायची नाही, असे सांगून दिलीप जाधव यांनी मला पोलिसांचे समोर हाकलून लावले होते,
त्यामुळे शासकीय भरणा केलेली रक्कम रुपये ६५७७ हेही बुडीत गेली आहे.यापुढेही आणखीन एक वेळेस पोलिस बंदोबस्ताचे पैसे भरण्यास मी तयार आहे.शेतातील मशागत करतेवेळी महसूल अधिकारी व पोलिस कर्मचारी हजर राहून उपविभागीय अधिकारी जत व जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशाप्रमाणे जर ७ दिवसांत कारवाई करावी,अन्यथा मी आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here