बसवकल्याण येथे १८ ते २० ऑक्टोंबर अखेर २० वे कल्याण पर्व

0
3

जत,संकेत टाइम्स : कायक ही कैलास म्हणून घोषित केलेले बिदर जिल्हा बसवकल्याण सुक्षेत्र येथे १८ ते २० ऑक्टोंबर अखेर २० वे कल्याणपर्व संपन्न होत आहे.

 

 

बसवधर्मपीठ कुडलसंगमचे महाजगत् गुरू डॉ.माता गंगादेवी दिव्य सानिध्यात तर तेलंगणाचे जाहीराबादचे खासदार बी.बी.पाटील यांच्या शुभहस्ते बसवज्योती प्रज्वलन होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय इंधन सचिव शरण भगवंत खूबा यांच्याहस्ते,बसवध्वजारोहण कर्नाटक राज्य पशूसंगोपन सचिव शरण प्रभू चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.

 

 

लिंगायत धर्म मान्यता संघर्ष व धर्मावर जनगणती जागृत्ती या विषयावर श्री.निजगुणप्रभू तोंटदार्य स्वामीजी व कल्याणापासून विश्वकल्याण या विषयावर बसव तत्वचिंतक रमजान दर्गा हे विचार व्यक्त करणार आहेत.यावेळी महिला गोष्टित अनेक महिला विचारवादी सहभागी होणार आहेत.

 

 

 

शरण वंदना सातशे सत्तर शरण-शरणींना शरणार्थी समर्पण करण्याचा विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.द्वितीय शून्य पीठारोहणाचा १९ वा वार्षिकोत्सव महाजगत गुरू सिध्दरामेश्वर स्वामीजीकडून संपन्न हाईल.तीन दिवसाच्या या पवित्र कार्यक्रमात अनेक मठाधीश,समाजसेवक, राजकीय नेते सहभागी होऊन प्रबोधन करणार आहेत.

 

 

दररोज योग शिबीर,इष्टलिंगयोग व दीक्षा कार्यक्रम,वचन गायन,सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी राहण्याची व जेवणाची सोय आहे.
बसवकल्याण येथे बसवेश्वरांनी अनुभव मंडप म्हणजे प्रथम संसद स्थापना केले. त्या अनुभव गोष्टीत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यतचा असख्यांत शरणगण सहभागी होऊन वचन साहित्याची रचना केली आहे.

 

 

या विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बसव भक्तांनी सहभागी व्हावे,असे आवाहन बसवधर्मपीठ कुडल संगमचे राष्ट्रीय बसवदल खोजानवाडी ता.जतचे अध्यक्ष एम.जी.काराजनगी सर यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here