जत तालुक्याचे आमदार कालकथित उमाजीराव सनमडीकर यांचे जत शहरातील सिध्दार्थ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.त्याबरोबर स्मृतीग्रंथ प्रकाशिक करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील पहिली बैठक स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सांवत,सिध्दार्थ शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
तसेच यावेळी रूपरेषा ठरविण्यात आली.त्याप्रसंगी माजी सभापती बाबासाहेब कोडग,संस्थेचे विश्वस्त श्री.मेंडेगार सर,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, डॉ.मनोहर मोदी,अशोक सांगलीकर माजी जि.प.सदस्य,श्रीनिवास भोसले,प्रकाश भोसले,तानाजी बोराडे,धानाप्पा ऐनापुरे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री.शिंदे,बाबासाहेब काटे, मेसाप्पा नाईक,सिंदूरचे माजी संरपच आव्हाणा कांबळे,व इतर क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर तसेच संस्थामधील प्राचार्य आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
जतचे आमदार कालकथित उमाजीराव सनमडीकर यांच्या स्मारक समितीची बैठक संपन्न झाली.