जतेतील शासकीय कार्यालयांना झालयं तरी काय? | वजनाशिवाय काहीही हालेना | महसूल,पंचायत समिती,भूमि अभिलेख आघाडीवर

0

जत

संकेत टाइम्स वृत्तसेवा 

 

जत तालुक्यातील शासकीय कार्यालयांना वरकमाई व भ्रष्ट कारभाराची किड लागली आहे.याला तालुक्यातील एकही कार्यालय अपवाद राहिलेले नाही.गावातील ग्रामपंचायत, तलाठी ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यत सर्वांचे हात बरबटलेले असून सर्वाचे कमाईचे आकडे ठरलेले आहेत.अधिकारी,कर्मचारी,उमदेवार,दलालामुळे सामान्य नागरिक भरडून निघत आहे.या प्रकाराला पायबंध घालणारी राजकीय व्यवस्था या अधिकाऱ्यांची दास झाल्याचा आरोप होत आहे.यामुळे एकही शासकीय काम पैशाशिवाय होत नसल्याचे वास्तव तर आहेच,त्याशिवाय तालुक्यात मोठा निधी येऊनही विकास कागदावर दिसत असल्याचे आरोप होत आहेत.

 

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जत तालुक्यात जत‌ तहसील कार्यालय,संख अप्पर तहसील,जत उपविभागीय अधिकारी,पंचायत समिती,जत नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन,महावितरणची जत,संख येथे,जलसंधारणचे उपविभागीय,तालुका,वनविभाग,सामाजिक वणीकरण,भूमिअभिलेख,उपनिबंधक खरेदी विक्री,उपनिंबधक सहकारी संस्था,उपविभागीय कृषी,तालुका कृषी,जलसंपदाची अनेक कार्यालये,पांटबंधारे,जत,उमदी पोलीस ठाणे,जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,यासह प्रत्येक गावात तलाठी,ग्रामपंचायत,महसूल,कृषीचे मंडल विभाग अशी मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालयातून तालुक्याचा कारभार चालतो.

 

 

 

मात्र यातील बोटावर मोजण्याएवढ्या कार्यालयातील कारभार काही प्रमाणात बरा चालतोय,अन्यथा इतर सर्व कार्यालये लाच,भष्ट्राचाराने वाकली असून येथे येणारे नागरिक त्यांच्या कारभाराने पिचले आहेत.मुर्दाड अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून त्यांना नागविण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.येथे येणारा प्रत्येक अधिकारी,कर्मचारी वळणावर जात असून यात तालुक्यात रात्र् न् दिवस काबाडकष्ट करून मिळविलेला पैसे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या झोळ्या भरण्यासाठी ओतत आहे.तरीही त्यांची कामे होतीलच याची शाश्वती नसल्याचे चित्र आहे.

 

 

महसूल,पंचायत समिती,नगरपरिषद आघाडीवर
Rate Card
जत शहरातील तहसील कार्यालयातील सर्व विभाग,पंचायत समितीचे सर्व विभाग व तालुक्यात एकमेव असणारी जत नगरपरिषदेत सर्वाधिक भ्रष्ट कारभार चालत असल्याचे वारवांर आरोप होत आहेत.तालुक्यातील समाजसेवेची झूल पांघरलेले सामाजिक, राजकीय नेते यावर ब्र शंब्द काढायला तयार नाहीत.त्याचे हाताची घडी तोंडावर बोट स्थितीमुळे अधिकारी,कर्मचारी वेगळा अर्थ काढून जनतेला नागवून आपल्या झोळ्या भरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.