अपघात,डोक्यास गंभीर दुखापत,प्रंचड‌ रक्तस्राव,चिंताजनक रुग्णाला दिले जीवदान | मिरजमधील श्रीरत्ना हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यश

0
करजगी
संकेत टाइम्स, वृत्तसेवा

माणिकनाळ ता.जत येथील एका अपघातात डोक्याला गंभीर दुखापत,मोठ्या प्रमाणात झालेल्या डोक्यातील रक्तस्रावमुळे अंत्यत गुंतागुंतीची परिस्थिती झालेली असतानाही आपले कौशल्य पणाला लावून मिरज येथील श्रीरत्ना हॉस्पिटलचे मेंदूरोग तज्ञ डॉ.देवदत्त पाटील यांनी तात्काळ शस्ञक्रिया करून रुग्णाचा मृत्यू समोर दिसत असतानाही जीवदान दिले आहे.विशेष म्हणजे उपचारासाठी अगदी नाममात्र शुल्क त्यांनी घेतले आहे.

 

 

 

 

अधिक माहिती अशी,माणिकनाळ येथील 21 वर्षीय मल्लिकार्जुन माने यांचा गेल्या पंधरवड्यात अपघात झाला होता.यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती.प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृत्ती चिंताजनक बनली होती.रुग्णांची स्थिती बघून काही हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला होता.मात्र जतचे भूमिपुत्र असलेले डॉ.गुरू बगली यांच्या मिरज‌ येथील श्रीरत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेत तात्काळ उपचार सुरू केले.

 

 

 

मेंदूरोग तज्ञ डॉ.देवदत्त पाटील यांनी कौशल्यपुर्ण शस्ञक्रिया करत अगदी अत्यल्प दरात उपचार करत मल्लिकार्जुन माने यांना ठणठणीत बरे केले आहे.माने यांचा एकप्रकारे पुनर्जन्मच झाला आहे.
याबद्दल माणिकनाळ येथे श्रीरत्ना हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.गुरू बगली यांचा माने कुटुंबाच्या वतीने सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ.गुरू बगली म्हणाले,
माझ्या गावाकडची नाती रक्ताच्या पलीकडचे आहेत.प्रत्येक रुग्णांना बरे करणे हे आमच्या टिमचे ध्येय असते.

 

 

Rate Card
मल्लिकार्जुन माने यांना आमच्याकडे दाखल करतेवेळी डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.माने पुर्णत: बेशुद्धावस्थेत होते.त्यांच्यावर काही हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास नकार दिला होता.मात्र आम्ही आवाहन स्विकारत त्यांना दाखल करून अतिदक्षता विभागमध्ये दाखल करत आमचे मेंदूरोग तज्ञ देवदत्त पाटील यांच्या टिमने तात्काळ शस्ञक्रिया करत त्यांचे प्राण वाचवले.

 

 

 

ग्रामीण भागातील गोरगरीब,सामान्य रुग्णांना अगदी अत्यल्प दरात आम्ही सेवा देत आहोत,असेही बगली म्हणाले.यावेळी सोसायटी संचालक आप्पासाहेब बगली, मासीद्धा बगली,दावल मुल्ला, सोमनिंग बसणाळ,ओगप्पाघेरडी,साबू कुंभार,कांतु कुंभार,दस्तगीर मुल्ला, अण्णाप्पा भगली,अमसिद्ध बगली,शंकर खांडेकर, मल्लू ऐवळी,संजय खांडेकर, मलकारी माने, रहिमान मुल्‍ला, पिंटू यमगल, शिदराय बगली,मदरसाहेब मुल्ला, रमेश कांबळे, हनुमंत बसणाळ, आप्पासाब शिवणगी, विजय कुंभार, दशरथ कांबळे,अर्जुन घेरडे,जीवप्पा  कांबळे,बाबुशा कांबळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.