नगरसेविका शारदाताई कुंभार यांनी दांडीया स्पर्धा भरवुन महिलांना एकत्र आणण्याचे चांगले काम केले ; मिनल सांवत

0

जत

संकेत टाइम्स ऑनलाइन

 

 

जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका शारदाताई कुंभार यानी महिलांसाठी दांडीयास्पर्धा भरवुन महिलांना एकत्र आणण्याचे चांगले काम केले आहे. असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत फाउंडेशनच्या संचालीका व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या भगिनी सौ.मिनलदिदी सावंत (पाटील) यानी केले.

 

 

त्या येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार युवा मंच यांच्यामाध्यमातून भरविण्यात आलेल्या दांडीयास्पर्धा व लहानमुलांसाठी वेषभूषण स्पर्धानिमित्त आयोजीत कार्यक्रमात मार्गदर्शन करित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौभाग्यवती सौ.वर्षाताई सावंत या होत्या.

 

 

या प्रसंगी बोलताना सौ.मीनलताई सावंत-पाटील म्हणाल्या की,ख महिलानी दररोजच्या धकाधकीच्या वेळा व गृहीनीची जबाबदारी पार पाडत अशा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. सौ.शारदाताई कुंभार यांनी महिलांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन जगण्याचे बळ दिले आहे.

 

 

यावेळी बोलताना आमदार सौभाग्यवती सौ वर्षाताई सावंत म्हणाल्या की, चंद्रकांत कुंभार युवा मंच ने हा चांगला उपक्रम महिलांसाठी राबविला आहे. यामुळे महिलांची करमणूक होत आहे. अशा कार्यक्रमांना महिलानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन ही त्यानी केले.

Rate Card

 

 

यावेळी माजी जि.प.सदस्या सौ.मिनाक्षीताई अक्की, नगरसेविका सौ.भारती जाधव, शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार,संतोष कुंभार,प्रसाद जेऊर, प्रविण जाधव,श्रीकृष्ण पाटील,इंजिनिअर शरणाप्पा अक्की, माजी नगरसेविका सौ. शारदा कुंभार, योगशिक्षीका सौ.अनुराधा संकपाळ, सौ.वनकुद्रे, आदी उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमाला जत विद्यानगर, शिवनगर, बसवेश्वर नगर, शिक्षक काॅलनी, चैतन्य नगर, कुंभार प्लाॅट येथिल महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कुंभार, गौरी जेऊर, सौ.गिता वनकुद्रे,सौ.संपदा कुलकर्णी, श्री. सुभाष शिंदे सर यानी केले. तर आभार च॔द्रकात कुंभार यानी मानले.

 

 

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दांडीयास्पर्धा अध्यक्षा सौ.शारदा कुंभार व सहकारी महिला त्याचप्रमाणे प्रदिप कोळी,विजय शरण, हरिष चौगुले, संतोष कुंभार, संतोष अंगडी, राजू खडतरे, कुमार नागमोती, पवन कुंभार, ईमरान नदाफ,बबलू कोळी, सुनिल व्हनखंडे यानी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.