पलूस : पलूस तालुक्यातील पुणदी गावी बेकायदेशीर सावकार भिमराव भाऊ मोटे यांचेवर सावकारी सेल व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत २ लाख ५१ हजार ८७३ रुपयेचा माल व नोटरी व कोरे चेक जप्त केले आहेत.पोलीस अधीक्षक,सांगली यांनी पोलीस अधीक्षक, कार्यालयामध्ये स्थापन केलेल्या सावकारी सेल मार्फत करण्यात येण्याऱ्या अर्ज चौकशी वरुन गजानन बाळु मोरे यांनी दिलेल्या अर्जाच्या चौकशी आरोपी भिमराव भाऊ मोटे यांच्या बेकायदेशीर सावकारीबाबत चौकशी करण्यात आली.
त्यामध्ये भिमराव मोटे हे लोकांना रोखीने कर्ज देवुन मासिक १० टक्के व्याज दराने रक्कम स्विकारतात तसेच कर्ज देताना घेतलेले कोरे चेक हे केवळ खातेदाराची स्वाक्षरी घेतात आणि त्यानंतर मनमानीप्रमाणे ते या चेकचा वापर न्यायालयीन चलनक्षम कायद्याचा वापर करुन संबंधीतावर वाढीव रक्कमेची मागणी करुन चेकची कारवाई कलम १३८ प्रमाणे करीत असलेबाबत अर्जाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने याप्रकरणी सांगली येथील मुस्ताकअली गुलाब बागवान (रा. सांगली, खणभाग) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी भिमराव भाऊ मोटे यांचेविरुध्द बेकायदेशीर सावकारी करणे व कोरे चेक घेणे आणि कलम १३८ प्रमाणे न्यायालयामध्ये खटले भरुन कर्जदार याना त्रास देणे या कलमाप्रमाणे कुंडल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन
पोलीस उप निरीक्षक मिरजे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोफी अच्युत सुर्यवंशी यांच्या पथकाने संशयित आरोपीस अटक केली आहे. त्याची बुलेट गाडी व हिरों होंडा गाडी तसेच रोख रक्कम २६ हजार ८७३ रुपये या सह एकूण रक्कम २ लाख ५१ हजार ८७३ रु चा माल जप्त करण्यात आला.त्यामध्ये कोरे चेक व नोटरी याबाबतचे बरेच कागदपत्रे आरोपीच्या घरात जप्त करण्यात आले आहेत.सावकारीच्या माध्यमातुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भिमराव भाऊ मोटे यांचे विरुध्दात ज्याच्या तक्रारी असतील त्यांनी कुंडल पोलीस ठाणे येथे सक्षम येऊन तक्रारी कराव्यात,असे आवाहन पोलीस अधीक्षक, सांगली यांनी केले आहे.
ReplyForward
|