शेगांव : मे.रासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस व निधी मास्टर यांच्यावतीने सांगली येथे सेमिनार आयोजित करण्यात आले होते.या सेमिनारमध्ये शेगांव (ता.जत) येथील शिवशंभो मल्टीपर्पज निधी बँकेचा निधी मास्टर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार स्विकारताना शिवशंभो मल्टीपर्पज निधी बँकेचे चेअरमन लक्ष्मणराव बोराडे,शाखाधिकारी शहाजी गायकवाड,लिपिक लवकुमार मुळे, भारत शिंदे, मे.रासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रदीप रासनकर,सीए कुंभार सर व त्यांची संपूर्ण टीम तसेच जिल्ह्यातील निधी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवशंभो मल्टीपर्पज निधी, शेगांव निधी कंपनी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली. या दोन ते अडीच वर्षात निधी कंपनीने सभासद वाढीसाठी प्रयत्न केले.आर्थिक पाया मजबुतीसाठी निधीच्या ठेवी वाढीसाठी प्रयत्न केले.कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य माणसांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आले. सामान्य व गरजू सभासदांना आवश्यकतेनुसार दुग्ध व्यवसाय व इतर व्यवसायासाठी कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल कंपनीची आहे.या दोन वर्षात कंपनीने ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. गरजूंना अत्यंत तातडीने कर्जपुरवठा करुन व्यवसाय वाढीस बळकटी देण्याचे काम कंपनी करत आहे. सामान्य माणूस आर्थिक दृष्ट्या कसा सक्षम होईल व सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती साधून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कंपनी या पुढील काळात विशेष प्रयत्न करणार आहे.
तसं पाहिलं तर जत तालुक्यातील शेगांव हे गाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी गाव.मात्र गेल्या चार पाच वर्षात या परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी आले.बागायती पिकामुळे सामान्य शेतकऱ्याची पाण्याची सोय झाली असली तरी आर्थिक उन्नतीचा या परिसरात कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता.सद्यस्थितीत काही युवा पिढीला नोकऱ्या नाहीत.व्यवसाय करावा म्हटलं तर भांडवलाचा प्रश्न.अशा अनेक आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तरुण वर्गाला व सामान्य नागरिकांना निधी कंपनी आश्वासक वाटत आहे.कंपनीची विश्वासार्हता जत शहराबरोबर जत उत्तर भागातसुद्धा वाढत आहे.