भूमि अभिलेख कार्यालय नव्हे,लुट कार्यालय | कसेही लुटा ; मुर्दाड अधिकारी,कर्मचाऱ्यामुळे शेतकऱ्यांना लाचार होण्याची वेळ

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुका हा विस्ताराने राज्यात सर्वात मोठा तालुका असून तालुक्यात 127 गावे आहेत. जत तालुका हा नैसर्गिक दृष्ट्या दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोक शेती व्यवसाय करीत असतात परंतू निसर्गाच्या लहरपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेत जमिनीचे, घर जागा व इतर रेकॉर्ड हे भूमी अभिलेख कार्यालयात असते म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमी अभिलेख कार्यालयात मोठी गर्दी असते. कार्यालयात कर्मचारी अपुरे असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नाहीत.या फायदा उमेदवार व दलाल घेत असून नकाशे उतारे काढण्यासाठी शासनाच्या दराच्या दहा दहा पट पैसे घेऊन आपल्या तुंबड्या भरत आहेत.
याला पैसे देऊन आलेले अधिकारी छुपा पाठिंबा देत आहेत.त्यात त्यांची कमाईही निश्चित असल्याने कारवाई करतो,यापलिकडे ते काहीही करत नसल्याचे आरोप होत आहेत.दुसरीकडे पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र महिंनो- महिने  हेलपाटे मारावे लागत आहेत.वजन नसल्याने त्यांची कागदपत्रेच उमेदवारांना सापडत नसल्याचे चित्र आहे.

 

Rate Card
विशेष म्हणजे मोजणी,उतारे,जमिनीचे नकाशे व जूनी माहिती मिळविण्यासाठी शेकडो शेतकरी येथे हेलपाटे घालतात.त्यांना दररोज उद्या काम होईल म्हणून उमेदवार,कर्मचारी व त्यांच्या वरचे अधिकारी हेळसाड करत आहेत.कोन वालीच नसल्याने व मुर्दाड अधिकारी व कर्मचारी वेसन मुक्त असल्याने आगतिक होऊन या कार्यालयातील यंत्रणेची दास होण्याची वेळ तालुक्यातील शेतकरी व नागरिकावर आली आहे.
माहिती अधिकार अर्जाला केराची टोपली
येथे माहिती मागून दमलेले अनेक‌ शेतकरी माहिती अधिकार कायद्याचा आधार घेतात.मात्र गेल्या वर्षभरात या कार्यालयाकडून एकाही अर्जाला माहिती दिलेली नाही.काही अर्ज कचरा पेठीत टाकल्याची चर्चा आहे.त्यातील अनेक अर्ज पुणे आयुक्त कार्यालयाकडे आपिलात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.