जतेत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
जत,संकेत टाइम्स : राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त जत शहरातील वृत्तपत्र विक्रेते यांचा सत्कार करणेत आला. एकात्मिक विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर शिनगारे व राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले यांचे नियोजनातून करणेत आला होता. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक हैदराबादे गुरुजी,भारत माळी, मुबारक मुल्ला यांच्या हस्ते सर्व वृत्तपत्र विक्रेता बांधवांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
आजवर वृत्तपत्र विक्रेता बांधवांचा सत्कार कोणीही केला नाही, पण आपण केला” असे भावनिक शब्द ही यावेळी उपस्थित वृत्तपत्र विक्रेता बांधवां कडून व्यक्त करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते गोरखनाथ पवार,भीमाशंकर आठवने,विलास बामणे, अशोक वाघमारे, अशपाक हुजरे,मांतेश डोनुर,राजू मुल्ला उपस्थित होते.
