निराधारांचे योजनेची पेन्शन लवकर जमा करा…

0
6
जत,संकेत टाइम्स : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जतचे वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, अपंग व्यक्तींच्या पेन्शन योजना, विधवा महिलांच्या पेन्शन योजना या संबंधित प्रश्न तात्काळ सोडवावेत अशी मागणी करण्यात आले,तसे निवेदन जतचे‌ तहसीलदार यांना देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे सी, मागील किमान ३-४ महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ पेन्शन योजना, अपंग व्यक्तींच्या पेन्शन योजना, विधवा महिलांच्या पेन्शन योजना या कोणत्याही योजनेची पेन्शन मिळालेली नाही.या बाबींकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे आणि ते त्यांनी द्यावे व संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची ही पेन्शन लवकरात लवकर मिळावी, ही मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

 

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग, सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, जत एकात्मिक विकास फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शिनगारे, विजय फडतरे, मांतेश जंगम, दत्ता बिराजदार, सचिन पांढरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here