जत पुर्व भागातील 64 गावच्या सिंचन पाणी योजनेसाठी 850 कोटीची तरतूद करा : विवेक कांबळे

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील पुर्व भागातील ६४ गावाच्या पाणीप्रश्नासाठी राज्यसरकारला साडेआठशे कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार असून यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकित ठराव होणे गरजेचे आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागणार असल्याने महाविकास आघाडी सरकारने म्हैशाळ विस्तारीत योजनेचे गाजर जत तालुक्यातील ६४ गावातील लोकांना दाखविणे बंद करावे असा ईशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस व सांगली-मिरज महापालीकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

 

 

 

विवेक कांबळे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री मा. ना .रामदासजी आठवलेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून जत तालुक्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी आमचा लढा सुरू आहे. जत तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी आम्ही पक्षाच्यावतीने तालुकास्तरावर व जिल्हयाच्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत.

 

 

नुकतेच संख येथिल बाबामहाराज मंगल कार्यालयात आम्ही जत तालुक्यातील पुर्व भागातील ६४ गावांना शेतीसाठी व पिण्यासाठी म्हैशाळ विस्तारीत योजनेव्दारे पाणी मिळावे यासाठी मोठा मेळावा घेऊन पाण्यापासून वंचित असलेल्या ६४ गावांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे.

 

 

याचाच भाग म्हणून आम्ही कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. मिलिंद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी जत तालुक्यातील पुर्व भागातील ६४ गावांच्या पाणीप्रश्नाविषयी सविस्तर चर्चा केली असता कार्यकारी अभियंता श्री. नाईक यानी याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

 

जत तालुक्यातील ६४ गावांना पाणी देण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयंत पाटील यानी वारणा खोरेतून सहा टि.एम.सी. पाण्याची तरतूद केली असून या योजनेचा आराखडा ही तयार केला आहे.

 

 

आराखड्यानुसार जत तालुक्यातील सहा टि.एम.सी. पाणी देण्यासाठी म्हैशाळ उपसासिंचन योजनेच्या तिसरे टप्प्यातून बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणी उचलून ते पाणी जत तालुक्यातील मल्लाळ येथिल तलावात सोडून त्यानंतर बंदिस्त पाईपलाईनव्दारे ते पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागातील चौसष्ट गावांना देता येणार आहे.

 

 

 

सद्या या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या आराखड्यासाठी जलसंपदा विभागाने एका एजन्सीला बिलो २१ टक्के दराने दिडकोटी रूपये मंजूर केले आहेत.

 

 

या विषयी बोलताना विवेकरावजी कांबळे म्हणाले की, जत तालुक्यातील पूर्व भागातील ६४ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये ईच्छाशक्ती पाहीजे. परंतु ही ईच्छाशक्ती या सरकारमध्ये दिसून येते नाही.

 

 

Rate Card

अजून या योजनेचा आराखडा तयार नाही. योजनेसंदर्भात कोणतीही फाईल तयार नाही. योजनेचा सर्वे नाही. सर्वे न करताच म॔त्र्यानी घोषणा केली आहे. या योजनेसंदर्भात जी पुर्तता व्हायला पाहिजे ती पुर्तता झाली नाही. या योजनेसंदर्भात फक्त चर्चाच चालू असून चर्चेने प्रश्न सुटत नाहीत.

 

 

 

या योजनेसाठी राज्यसरकारकडे निधिची कोणत्याही प्रकारे उपलब्धता नाही. त्यातच केद्रातील सरकार हे सर्वच विभागाचे खासगीकरण करू लागले आहे. त्याचप्रमाणे राज्यसरकारही जलसंपदा विभागाचे खासगीकरण करणार असल्याची चर्चा आहे.

 

 

जत तालुक्यातील पूर्व भागातील चौसष्ट गावांना विस्तारीत म्हैशाळ योजनेतून सहा टि.एम.सी. पाणी मिळण्यासाठी महत्त्वाचे आहे राज्य सरकारने कॅबिनेट बैठक बोलावून त्या बैठकीला या योजनेसाठी लागणारे साडेआठशे कोटी रूपयांची तरतूद करून त्याला मंजूरी मिळविणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढ व विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये ही जत तालुक्याला वारणा खोरेतून विस्तारीत म्हैशाळ योजनेतून पाणी मिळावे, वंचित पूर्व भागातील ६४ गावांना त्यांच्या हक्काचे सहा टि.एम.सी. पाणी मिळावे यासाठी निवेदन देऊन सविस्तर चर्चा ही केली आहे.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन ते अडिच वर्षाचा प्रदिर्घ कालावधी लागणार आहे. त्यातच पाटबंधारे विभागाने योजनाचा आराखडा बनविण्याचे काम एका एजन्सीला दिड कोटी रूपयाला दिले आहे. हे काम ज्या एजन्सीला दिले आहे त्या एजन्सीचे नाव विभागाने गुलदस्त्यात ठेवले असून प्रत्यक्षात या योजनेच्या आराखडा तयार करण्यासाठी चाळीस लाख इतका खर्च होत असताना एककोटी रूपये जादा खर्च कोणासाठी करण्यात येणार आहे. या मागे गौडबंगाल काय आहे असा आरोप ही विवेकरावजी कांबळे यांनी केला आहे.

यामुळे महाविकास आघाडी सरकारने जत तालुक्यातील पुर्व भागातील ६४ गावतील लोकांना विस्तारीत म्हैशाळ योजनेच गाजर दाखविणे बंद करावे असा ईशारा ही कांबळे यांनी दिला आहे.

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, रि.पा.इं.जिल्हाध्यक्ष. संजय कांबळे, रि.पा.इं. युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, रि.पा.इं. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायाताई सर्वदे, रि.पा.इं.रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरूण आठवले, पलुस तालुका रि.पा.इं.विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शितल तिरमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.