सांगली जिल्ह्यात 86 हजार जणांनी घेतला कोरोना लसीचा डोस

0
सांगली : जिल्ह्यात कोविड-19 महालसीकरण अभियान दि. 21 व 22 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आले. या अभियानात पहिल्या दिवशी 43 हजार 837 नागरिकांनी तर दुसऱ्या दिवशी 42 हजार 621 नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला. अशा एकूण 86 हजार 458 नागरिकांनी कोरोना लस घेतली.

 

 

याबद्दल पालकमंत्री जयंत पाटील यांनी लस घेतलेल्यांचे अभिनंदन केले व ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही किंवा लसीचा दुसरा डोस घेतला नाही तो घ्यावा. यापुढील काळातही आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण पूर्णपणे मोफत सुरू राहणार आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.