सकाळी घर बंद दिसले,संध्याकाळी फोडले | पाळत‌ ठेवून चोरट्याचा कारभार

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या हुसेनसाब अब्दुलसाब मदभावी यांचे बंद घर फोडून ४७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

अधिक माहिती अशी, हुसेनसाब मदभावी हे जत शहरातील शिवाजी चौक येथील रुकसामा ईलाई मुल्ला याच्या घरात भाड्याने राहतात. शनिवारी कुंटुबियांसह ते गिरगाव येथील मामाच्या गावी गेले होते.यांचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोंयडा तोडून घरात प्रवेश करत तिजोरीतील ५ हजार रोख,
३० हजाराचे दिड तोळ्याचे गंठण,१० हजाराची कानातील कर्णफुले,२ हजार एक ग्रँम सोन्याची अंगठी असा ४७ हजार रूपयाचा‌ मुद्देमाल लंपास केला आहे.

 

 

 

 

 

जत शहर दिवसेन्,दिवस असुरक्षित बनत असून चोरट्यांनी शहरभर धुमाकूळ घातला आहे.एक दिवस घर बंद दिसले तर ते मध्यरात्री फोडले जात आहे. त्याशिवाय शहरातील अनेक गटात सातत्याने वादावादीचे प्रकार घडत असून शहर दहशतीखाली आहे.पोलीसाच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अनुभवी कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे.तेथे दुसरे कर्मचारी नेमलेले नाहीत.परिणामी चोरटे,गुन्हेगारी फोफावली आहे.जतचे नवे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.