आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान पुणे नाशिक सह विविध केंद्रावर गोंधळ, परीक्षार्थीचे नुकसान

0
सांगली : रविवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा विविध केंद्रावर गोंधळ झाला आहे. पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर घोळ झाला. आबेदा इनामदार कॉलेज कॅम्प, पुणे येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचे 10.02 वाजूनही विद्यार्थ्यांना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. नाशिकमध्ये वेळ झाली तरी पेपर आलेच नव्हते.

 

 

 

परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना पुण्यातील आझम कॅम्पसमध्येही तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आणि एकच गोंधळ झाला. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थी संख्येच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.

 

 

 

पेपर मिळण्यात विलंब आणि आसनव्यवस्थेतील घोळावरुन परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. नाशिकमध्ये काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे.

 

 

 

Rate Card
तांत्रिक अडचण म्हणून राज्य सरकारने आपला गलथान कारभार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला , या परीक्षा मध्ये चालेला गोंधळ पाहता यामागे मोठा षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे, आरोग्य विभागातील सचिन वाझें कोण ? या घटनेचा निषेध रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी केला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.