दोन वर्षे विकासाची,विश्वासाची, सन्मानाची ; आ.विक्रमसिंह सांवत
जत,संकेत टाइम्स : 2 वर्षांपूर्वी संपूर्ण जत तालुक्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवत मला विधानसभेत पाठवलं. तालुक्याचं प्रतिनिधित्व विधानसभेत करत असताना एक वेगळं स्फुरण चढतं.
गेली 2 वर्षे मी संपूर्ण जत तालुक्याच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छा घेऊन तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहे,असे आवाहन सोशल मिडियावरून आवाहन करत आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आपल्या आमदारकीची दोन वर्षे पुर्ण झाल्याबद्दल जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आ.सांवत म्हणतात, आपणा सर्वांचं प्रेम आणि आशिर्वाद यापुढील काळात तितक्याच जोमाने काम करण्यास ऊर्जा देणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेवून जत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिल्याबद्दल मी संपूर्ण जत तालुक्यातील तमाम जनतेचा ऋणी आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.