सांगली : म्हैसाळ कागवाड रस्त्यावरराज्य उत्पादन शुल्ककडून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे २६९ बॉक्स जप्त करून ट्रक सह एकूण 27 लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ कागवाड रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्ककडून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रकवर मोठी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैशाळ ते कागवाड रस्त्यावर संध्याकाळी ५.३० वाजता एका टाटा कंपनीचा ट्रक क्र. जीजे १५,एव्ही १२४४ या मालवाहतुक ट्रक मधून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून गोवा राज्यातून आयात केलेल्या फक्त गोवा राज्यातच विक्री करिता निर्मिती केलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री करिता प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करित असल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने कागवाड म्हैसाळ रस्त्यावर सापळा रचला,संशयास्पद वाटणाऱ्या ट्रकची झडती घेतली असता गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे २६९ बॉक्स मिळून आले.विदेशी मद्यासह एकूण ६०० प्लॅस्टिक कॅन जप्त करण्यात आले. या ट्रकचा वाहन चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला आहे.
जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २७, ९०,७६० इतकी आहे.याप्रकरणी पसार झालेल्या संशयित ट्रक चालका विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) ८१, ८३ व ९० तसेच १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.