हळ्ळीत पान शॉप फोडले,काय करतायं पोलीस,दररोज एक चोरची घटना | तपासही लागेनात..
अधिक माहिती अशी की,हळ्ळी येथे विजापूर उमदी मार्गालगत यलगोंडा कावडे यांचे कार्तिक पान शॉप आहे ते रोजच्या प्रमाणे शनिवारी रात्री 8 वा पान शॉपी बंद करून घरी गेले मात्र रविवारी सकाळी आठ वाजण्याच्यासुमारास दुकान उघडून पाहिले असता दुकानाच्या मागील बाजूस असलेला पत्रा कापून आत प्रवेश करून ड्रॉवर मधील 5600 रक्कम लंपास केले आहे.
याची माहिती उमदी पोलिसांना समजल्यावर घटनास्थळी येऊन पंचनामा करून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.
