द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे 11 लाख‌ रूपये बुडविले | व्यापारी मोकाट

0

 

जत,संकेत टाइम्स : खोजानवाडी ता.जत येथील द्राक्ष व्यापारी संजयकुमार लक्ष्मण कलमडी व त्यांना साथ देणारे आई गंगव्वा लक्ष्मण कलमी व पोलीस पाटील चिदानंद काडाप्पा कलमडी यांनी २०१९ पासून खोजानवाडीतील लक्ष्मण महादेव हळोळी,हणमंत गणपती सुतार,महादेव बसगोंडा संती द्राक्षे घेतलेले पैसे दिले नाहीत,याबाबत पोलीसात तक्रार दिली.व्यापाऱ्याला अनेकवेळा पैसे मागूनही न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले.
Rate Card

 

दरम्यान पोलीसांनी पुन्हा शेतकऱ्याकडून तक्रार लिहून घेत,पंधरा दिवसात पैसे न दिल्यास संबधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करू,असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतल्याचे शेतकरी लक्ष्मण हळोळी,हणमंत सुतार,महादेव संती यांनी सांगितले.

 

 

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खोजानवाडीतील लक्ष्मण हळोळी,हणमंत सुतार,महादेव हळोळी हे शेतकरी द्राक्ष बागायतदार आहेत.२०१९ ला रात्रीचा दिवस करत त्यांनी द्राक्ष बागेत चांगले पिक आणले होते.गावातील व्यापारी संजयकुमार लक्ष्मण कलमडी यांनी पोलीस पाटील संजय कलमडी यांनी मध्यस्थी होत लक्ष्मण हळोळी,हणमंत सुतार,महादेव संती पैसे व्यवस्थित देईल म्हणून द्राक्ष द्यायला लावली होती.तिघा शेतकऱ्यांनी सुमारे ११,२७,९०० रूपये किंमतीची द्राक्ष दिली होती.मुदतीत व्यापारी कलमडी याने पैसे दिले नाहीत.

 

 

त्यानंतर आम्ही तगादा लावल्यानंतर त्यांने चेक व स्टँप दिले.तेही खात्यावर पैसे नसल्याने पास झालेले नाहीत.त्यामुळे व्यापाऱ्यांने फसवणूक केली म्हणून तिघा शेतकऱ्यांने २९/७/२०२१ रोजी जत पोलीसात तक्रार अर्ज दिला होता.त्यावेळी व्यापारी कलमडी यांने उपनिरिक्षक श्री.कोळी यांच्या समोर दिड महिन्यात पैसे देतो असा जबाब दिला होता.मात्र आजपर्यत पैसे मिळालेले नाहीत.
पोलीस पाटील संजय कलमडी,आई गंगवा कलमडी यांनी राजकीय नेत्याकडून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकून आमची फसवणूक केली आहे.

 

 

त्यामुळे आमचे नुकसान झाले आहे.रात्रीचा दिवस करून आम्ही पिकविलेल्या पिकाचे पैसे मिळत नसतीलतर जगायचे कसे म्हणून आम्ही उपोषणास बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.दरम्यान सायकांळी सात वाजता विभागीय पोलील अधिकारी रत्नाकर नवले यांच्या चेंबरमध्ये शेतकऱ्यांची बैठक झाली.त्यात पंधरा दिवसात व्यापाऱ्यांने या शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत.तर रितसर गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

 

व्यापारी २०१९ पासून मोकट
खोजानवाडीतील व्यापारी संजयकुमार कलमडी यांने महागडी चारचाकी घेऊन फिरत या तिघा शेतकऱ्यांसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष घेतली होती.त्याची व्यापारी म्हणून कुठेही नोंदणी नव्हती.तरीही शेतकऱ्यांनी ओळखीवर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात द्राक्ष दिली होती.मात्र व्यापाऱ्यांने या सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.आम्हासह अन्य शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख रूपयाचे व्यापारी कलमडी देणे असल्याचे लक्ष्मण हळोळी,हणमंत सुतार,महादेव संती यांनी सांगितले.

 

 

 

 

खोजानवाडीतील शेतकरी द्राक्षाचे पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी,या मागणीसाठी उपोषणास बसले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.