मालवाहतूक वाहन चोरीतील चोरट्यास अटक

0
सांगली : शिरोली एमआयडीतून चोरलेली महिंद्रा मँक्सी ट्रकसह चोरट्यास सांगली पोलीसांनी पकडत वाहन जप्त केले आहे. शैलेश संजय कांबळे (वय २३,रा. माळवाडी, शिरोली एमआयडीसी, शिरोली, ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर)असे संशयिताचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी,पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचे पथक तासगाव शहरात पेट्रोलिंग करीत फिरत बेंद्री चौक, तासगाव येथे संशयित शैलेश कांबळे हा त्याचे कब्जातील एक पांढरे रंगाची महिंद्रा बोलेरो कंपनीची मॅक्सी ट्रक (एम.एच.११,ए.आर.४८६४)हि घेवुन संशयितरित्या फिरत असताना मिळून आला असता त्याला विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने ही गाडी शिरोली एमआयडीसी येथील बालाजी वजन काट्यामागे असले स्क्रँप गोडावुन येथुन सुमारे दोन महिन्यापूर्वी त्याने व त्याचे दोन साथीदार यांचेसह चोरी केली असल्याचे सांगीतले.

 

याबाबत खात्री केली असता गाडी चोरीची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद असल्याचे माहिती मिळाली.संशयित शैलेस कांबळे व जप्त गाडी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेच्या ताब्यात दिली आहे.संशयित कांबळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.