गुणवत्ता,सेवा व सचोटी ही यशस्वी उद्योगाची त्रिसुत्री | डफळापूरच्या युवा उद्योजक अंकुश माने यांची उत्तुगं भरारी

0
आपल्या परिस्थितीमुळे रडत राहायचं की परिस्थितीला सामोरे जाऊन तिला शरण आणायचं, हे दोन्ही पर्याय मनुष्यासमोर असतात. अंकुश माने यांच्यासारखे योद्धे दुसरा पर्याय निवडतात. संघर्षासह दोन हात करुन ‘संघर्षनायक’ म्हणून खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध करतात.’कोणताही उद्योग करताना गुणवत्ता,ग्राहकाभिमुख सेवा आणि कामातील सचोटी महत्त्वाची असते.

 

याच त्रिसूत्रीच्या जोरावर अनेक उद्योजकांनी यशाची शिखरे गाठल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.आजचा छोटा व्यावसायिक उद्याचा
उद्योजक होणार असतो.हे निश्चित असते‌ अशाच पध्दतीने दहावी शिक्षण घेतलेले डफळापूर येथील अंकुश संभाजी माने यांनी अगदी हलाखीच्या परिस्थितीतून एक पक्चर दुकान ते भव्य व जत तालुक्यातील सर्वात मोठे दुचाकी, चारचाकी,सायकलीच्या स्पेअर पार्ट,दुरूस्तीचे दुकान आजपासून ग्राहकांच्या सेवेत येत आहे.

 

 

खलाटी रोडला अंकुश माने हे आई-वडीलासोबत राहतात.वडील शेतीतील कामे करायचे,आई त्यांना मदत करत असते.जेमतेम १७ वर्षापुर्वीची गोष्ट अंकुशरावांनी दहावी परिक्षा दिली.आर्थिक परिस्थिती बेताची त्यामुळे काही करायला पाहिजे म्हणून ११ जूलै २००४ ला डफळापूर स्टँडनजिकचे एक बंद असलेले सायकल दुकानचे खोके त्यांनी विकत घेऊन तेथे छोटेसे सायकल दुकान सुरू केले.

 

 

अपार कष्ट करण्याची तयारी,गुणवत्ता,सेवा व सचोटी ही त्रिसुत्री  अंगीरत माने यांनी १७ वर्षात छोट्या खोक्याचे मोठे दुकान सुरू करण्यापर्यतची वाटचाल थक्क करणारी आहे.त्यांच्या यशाला आज चार चांद‌ लागले असून डफळापूर सारख्या छोट्या गावात सर्वात मोठ्या शोरूमचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होत आहे.
अवजड वाहने चारचाकी,दुचाकीचे सर्व पार्टस्,दुरूस्ती,सर्व कंपन्याचे ऑईल,अक्सेरिस,सर्व कंपन्याचे टायर,सर्व कंपन्याच्या लहानपासून मोठ्या पर्यतच्या सायकली,रेसच्या सायकली,वॉकिंग सायकल,दुचाकीच्या सर्व कंपनीच्या मोटार सायकलीचे पार्टस् दुरूस्ती,सर्व्हिंसिग,ग्रेसिंग,सर्व कंपन्याचे चारचाकी,दुचाकीचे पार्टस् होलसेल,रिटेल दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Rate Card
• सर्व कंपनीचे टायर्स (टु-व्हिलर,फोर-व्हिलर)
• सर्व मोटारसायकलचे स्पेअर्स
• नामवंत कंपनीचे ऑईल
• सर्व प्रकारच्या सायकल
• सर्व्हिसींग व पंक्चर
• सिट कव्हर कोंचिग करून मिळणार आहेत.
• सर्व टु-व्हिलर गाड्याचे स्पेअर्स योग्य दरात मिळतील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.