जत स्मशानभूमीजवळ पुन्हा कचरा डेपो

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील काही निर्लज्ज लोकामुळे विजापूर-गुहागर महामार्ग वरील स्मशान भूमीजवळ पुन्हा कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य ‌निर्माण झाले आहे.काही वर्षापुर्वी नगरपरिषदेने येथील कचरा डेपो निगडी रोडवर हलविल्याने हा परिसर स्वच्छ केला होता.

 

 

मात्र गत‌ काही महिन्यात येथील लगतचे नागरिक व व्यवसायिकाकडून पुन्हा कचरा टाकला जात आहे. तेथेच डुकरे,व मोकाट जनावरे धुडाळत आहेत.तर तेथेच आग लावल्यामुळे धूर धुमसत असल्याने येथून जा-ये करणाऱ्यांना तोंडाला रूमाल लावून जाण्याची वेळ आली आहे.यावर नगरपरिषदेने तातडीने कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.