जत,संकेत टाइम्स : दिवाळी सण तोंडावर असतानाही कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांचा जत नगरपरिषदेने पोत्साहन भत्ता अकविला आहे.
अनेकवेळा मागणी करूनही भत्ता दिला नसल्याने गुरूवारी संतप्त आशा वर्कर्सनी नगरपरिषद कार्यालया समोर थाळीनाद आंदोलन केले.
आंदोलनानंतर शहाणपण सुचलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी महेश वाघमोडे यांनी १० महिन्याच्या थकित कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्यापैंकी ५ महिण्याचा चेक काढण्याचे आश्वासन आशाना दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
मात्र उर्वरित ५ महिन्याच्या भत्त्यासाठी पुढील वर्ष उजाडणार काय असा सवाल उपस्थित झाला आहे.
जत शहरात तब्बल ३३ आशा वर्कर्स कार्यरत आहेत.विशेष म्हणजे शहरात कोरोना काळात या आशाचं जीव धोक्यात घालून बाधित रुग्णाची तपासणी,औषध उपचार करत होत्या.त्यांना या काळात प्रत्येक महिन्याला १ हजार रूपयाचा प्रोत्साहन भत्ता स्थानिक नगरपरिषदने द्यावेत,असे आदेश होते.
मात्र वरकमाईला सोकावलेल्या जत नगरपरिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी गेल्या दहा महिन्यापासून हा पोत्साहन भत्ता थकविला होता.आशांनी अनेक वेळा कार्यालयात चौकशी केली होती.मात्र आंदोलनाशिवाय न सुधारणारे नगरपरिषद प्रशासन आशांनी आंदोलन करण्याची एकप्रकारे वाटचं पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ऐन दिवाळी सणासाठी आपल्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून गुरूवारी आशांनी थेट नगरपरिषद गाठून थाळीनाद आंदोलन सुरू केले.
दरम्यान नगरपरिषदे समोर आशांना पाहून मुख्याधिकारी यांनी आपले अपयश झाकण्यासाठी थेट आशांना आंदोलन मागे नाहीतर गुन्हे दाखल करू असा दम दिला.मात्र आशा आपल्या मतावर ठाम राहिल्याने प्रशासनाने सपशेल शरणागती पत्करत पाच महिन्याचे प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांना द्यावे लागले.त्यानंतर आशांनी आंदोलन मागे घेतले.
मुख्याधिकारी काही घरातील पैसे देणार होते काय?कोरोना काळात अधिकारी कार्यालयातून बाहेर पडत नसताना आशांनी कोरोना बाधित रुग्णाच्या घरापर्यत जात तपासणी,औषधोउपचार करत होत्या.त्यांना घोषित केलेले पोत्साहन अनुदान तब्बल १० महिने थकविले जाते.त्या ते द्यावे म्हणून आंदोलन करत असताना मुख्याधिकारी त्यांना आंदोलन मागे घ्या, नाहीतर गुन्हे दाखल करू,असा दम देत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करतात.काय प्रोत्साहन भत्त्याचे पैसे हे मुख्याधिकारी घरातील देणार होते काय ?,तात्काळ आशांना भत्त्याचे पैसे द्यावेत,अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी नगरसेवक उमेश सांवत यांनी दिला आहे.
जत नगरपरिषदे समोर प्रोत्साहन भत्ता द्यावा म्हणून आशा वर्कर्स यांनी थाळी नाद आंदोलन केले.