जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात वाढलेल्या वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर तस्करांना जत महसूल विभागाकडून कारवाईचा दणका देण्यात आला आहे.शहरालगतच्या ढोण परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
शनीवारी पहाटे पावने सहाच्या सुमारास रोहीदास शिवाजी कांबळे यांच्या एमएच १०/००९४ या ट्रँक्टरमधून डोण भागातून विना परवाना वाळू वाहतूक करीत असल्याच्या संशयावर जत तहसील कार्यालयात आणून लावण्यात आला आहे.
जत तहसील कार्यालय परिसरात वाळू तस्करी होत असल्याचे अनेकवेळा समोर आले होते.त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे मंडल अधिकारी,तलाठी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.तब्बल सहा महिन्यानंतर वाळू तस्करां विरोधात पहिली कारवाई करण्यात आली आहे.अव्वल कारकून मुलाणी,मंडल अधिकारी संदिप मोरे,तलाठी रविंद्र घाडगे,कोतवाल सुभाष कोळी यांनी हि कारवाई केली आहे.
एका कारवाई काय होणार?जत महसूलच्या काही छुप्या रूस्तममुळे तालुक्यात बेधडक वाळू तस्करी सुरू आहे.तहसीलदार जीवन बनसोडे यांना वस्तूनिष्ठ माहिती दिली जात नव्हती.मात्र तहसीलदार बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत वाळू तस्कराविरोधात कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंडल अधिकारी,तलाठी सतर्क झाले आहेत.त्यांच्याकडून मोठ्या तस्करांवर यापुढेही मोठी कारवाई अपेक्षित आहे.नाहीतर कारवाईचे सोंग होता कामा नाही.
छुपा रूस्तम विरोधात दंडूका उगारण्याची गरजजत तहसील कार्यालयाकडील काही कर्मचारी,मंडल अधिकारी,तलाठी व कोतवालांना वाळू तस्कराकडून मिळकत मोठी असल्याने कारवाई गुंडाळली जात होती.अनेकवेळा तोंडे बघून कारवाईचे गौडबंगाल सातत्याने प्रश्नचिन्ह उभे करत होते.तहसीलदार बनसोडे यांनी अशा छुप्या रूस्तमवर कारवाईचा दणका देणे गरजेचे आहे.