सावधान.. | उभ्या वाहनातून डिजेल चोरणारी टोळी कार्यरत

0
जत : शेगाव (ता. जत) येथे एका सर्व्हिसिंग सेंटरच्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेलरच्या टाकीतून अज्ञात चोरट्यांनी ३०० लिटर डिझेल चोरल्याची घटना घडली.ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे.

 

 

 

शेगांव पासून जतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चार चाकी वाहनांची स्वच्छता करण्याचे सव्हिंसिंग सेंटर आहे.येथे मालवाहतूक करणारी वाहने उभी केली जातात.मध्यरात्रीच्या सुमारास या थांबलेल्या ट्रेलरमधून डिजेलची चोरी करण्यात आली आहे.

 

अशीच घटना मुंचडी रस्त्यावरही घडली आहे. याप्रकरणी जत पोलीसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Rate Card

 

 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.