प्रकाशराव जमदाडे यांच्यामुळे बिळूर परिसरातील शेतकऱ्यांचे भाग्य उजळेल | जगद्गुरु डॉ.चनसिद्धाराया पंडिताराध्य 

0
जत,संकेत टाइम्स : राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबर धार्मिक क्षेत्राला उभारी देण्याचे काम जमदाडे कुटुंबीयांनी केले आहे. बिळूर परिसरातील शेतकऱ्यांना माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या पाठपुरावा मुळे शेतीसह अन्य प्रश्न मार्गी लागतील.शेतकऱ्यांचे भाग्य उजळेल,असा आशावाद जगद्गुरु चन्मसिद्धराया पंडिताराध्य यांनी ते व्यक्त केले.ते बिळूर ता जत येथे जमदाडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

 

या कार्यक्रमास श्रीमद श्रीशैल सुर्यसिंहसनाधीश्वर श्री श्री श्री १००८  जगतगुरु डॉ.चन्नासिद्धाराय पंडीताराध्य शिवाचार्य भगवत्पाद, बेळंकी संस्थान मठाचे श्री.१०८ शिवलिंगा शिवाचार्य  स्वामीजी, बिळूर विरक्त मठाचे श्री.म.नि. प्र मुरगेंद्र स्वामीजी,श्री.म.नि. प्र. व्हळेहुचेश्वर महास्वामीजीं ,श्री.म.न.प्र विजयकुमार उर्फ मुरगेंद्र महास्वामीजीं श्रीशैत्र श्री.गुरू आप्पाजी हिरेमठ बबलादी ,श्री.श्री.श्री.मरुळ शिव शंकर स्वामीजी हूच्चेश्र्वर मठाचे बसवेश्वर महाराज,गुडडापूर चे श्री.ष. ब्र.१०८ गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी संस्थान हिरेमठ श्रीशैत्र, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज आदी धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.

 

 

 

जमदाडे कुटुंबियांच्या वतीने बिळूर, एकुंडी, वज्रवाड,गुगवाड,बसर्गी,सिंदूर, उमराणी व खोजनवाडी येथील सर्व स्वामीना गुरू मानून त्याचा येथीचीत सत्कार करून आशीर्वाद घेतले. सर्व शिवाचार्य स्वामीजींनी जमदाडे यांच्या या आगळ्या वेगळ्या कर्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या वाणीतून जमिनीचे महत्व ही पटवून दिले.
जमदाडे यांच्या घोलेश्वर येथील शिवनेरी अक्कॉ या वॉटर प्लांट मधून उत्पादन केलेल्या ५ बॉटलचे जगद्गुरूंच्या हस्ते पुजन केले.

 

 

यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे,मन्सूर खतीब,आप्पासो नामद,रामण्णा जीवनावर,शिवाप्पा तावसी,अँड.चनाप्पा होर्तीकर, संजू तेली,सोमनिंग बोरामनी,हलकुंडे सावकार,विठ्ठल निकम,सोमना हाक्के,जे के माळी,चंद्रकांत बामणे,संरपच नागणगौडा पाटील,प्रकाश बाबनगर,संगाया स्वामी,सिद्द मदभावी आदी मान्यवर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.