कासलिंगवाडीत महिलेला बांधून घालत ४ कोंबड्या पळविल्या

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात भुरट्या चोरट्यांची मुजोरी वाढली असून कासलिंगवाडी येथील एकट्या महिलेला जनावराच्या गोट्यातील मेढीला बांधून दोघा अज्ञात चोरट्यांनी १२०० रूपयाच्या ४ कोंबड्या चोरून नेहल्याची घटना शुक्रवार ता.२८ ला घडली आहे.याप्रकरणी छाया सुरेश कोळी यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.

 

 

 

 

अधिक माहिती अशी,छाया कोळी,पती सुरेश व मुलगा वैभव असे तिघे कासलिंगवाडी येथे राहतात.सुरेश मजूरी करतात,ते सध्या उमदी येथे द्राक्ष कामासाठी गेले आहेत.ता.२८ ला मुलगा वैभव हा मित्रासोबत शेगाव येथे गेला होता. संध्याकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास छाया कोळी या गोठ्याचा दरवाज्या बंद करण्यासाठी गेल्या असता अचानक कुणीतरी घरातील लाईट बंद केली.

 

 

 

अंधारात छाया यांना एक इसम दिसला,त्यांनी कोन आहे असे ओरडले मात्र तो काहीही बोलला नाही.तेवढ्यात पुढून एक इसमाने वाट अडवली.दुसऱ्यांने पाठीमागून येत दाव्याने गोठ्यातील मेढीला छाया यांना बांधले.छायाने लगतच्या घरातील जावेला हात मारली.मात्र चोरट्यातील एकाने तुझी जाऊ सांगलीला गेली आहे,ओरडू नकोस म्हणून तोंडाला बांधून खुराड्यातील चार कोंबड्या घेऊन दोघेही पळून गेले.

 

 

 

मुलगा वैभव आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पती,दिराला यांची कल्पना देऊन छाया कोळी यांनी पोलीसात धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.