जतच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळेनात | डॉक्टरांची मग्रूरी ; सामान्य रुग्णाचे हाल ; विकास साबळे यांचा आंदोलनाचा इशारा

0
जत,संकेत टाइम्स : जत ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉ.अजय भोसे यांच्या कारभारांची चौकशी करावी,अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, जत ग्रामीण रुग्णालयात उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने रुग्णाना खाजगीत उपचार घ्यावे लागत आहेत.

 

 

 

येथे नेमणूकीस असलेले अधिक्षक डॉ.अजय भोसेकर हे रुग्णांना कोणतीही तपासणी न करताचं उपचार करतात.बाहेरची औषधे लिहून दिली जातात.

 

 

 

टीटी,रेबीज सारखी इंजेक्शन देण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करतात.रुग्णांनी याबाबत विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देता.आमच्याकडे शासनाकडून इंजेक्शनचा दोनदोन महिने पुरवठा होत नाही.मी माझ्या पैशांनी इंजेक्शन आणून देऊ काय? मी तुम्हाला बोलवायला आलोय काय?मला जत नको होते,नाईलाजाने येथे आलोय?मला नोकरीची गरज नाही ?

 

 

कर्मचारी काम करत नाहीत,मलाच उठून सर्व कामे करावी लागत आहेत. अशा प्रकारे उध्दट उत्तरे देऊन रुग्णाची हेळसांड करत आहेत.यामुळे गोरगरिबांचा आधार असलेल्या या शासकीय रुग्णालयास घरघर लागली आहे.परिणामी गरीब रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांना एकतर खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो,तर पैशा अभावी काही रुग्णांना मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे.

 

 

 

एकीकडे केंद्र,राज्य शासन गरीब,गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून विविध योजना आखत असताना जत सारख्या दुष्काळी तालुक्यात येणारे डॉक्टर्स,कर्मचारी रुग्णांचे हाल करत आहेत. परिणामी खाजगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ रुग्णावर आली आहे. सध्या तालुक्यातील मोठ्या असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांनी पाठ फिरविली आहे.तातडीने रुग्णालयाचा कारभार सुधारावा अन्यथा तीव्र आंदोलन करू,असा इशारा साबळे यांनी दिला आहे.

 

फक्त अपघातातील रुग्णासाठी रुग्णालय
शासनाने लाखो रूपये खर्चून मोठी इमारात,डॉक्टर,नर्सेस,कर्मचारी नेमले आहेत.मात्र सर्वांचा हलगर्जीपणा,राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे शहरातील एकमेव शासकीय रुग्णालय अखेरची घटका मोजत आहे.अपघातग्रस्त,कोरोनाचे रुग्ण वगळता अन्य रुग्णांना उपचार मिळत नसल्याने रुग्णालय बिनकामाचे ठरत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.