भेसळीच्या संशयावरून अडीच लाखाहून अधिक किंमतीचा खवा जप्त | अन्न भेसळ विभाग जागा झाला  

0

 

सांगली : अन्न व औषध प्रशासनातर्फे परराज्यातून खवा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणी मोहिमेंतर्गत मिरज येथे दोन वाहनांवर छापा टाकून लाख 70 हजार 148 रूपये किंमतीचा हजार 78 कि.ग्रॅ. खवा विनापरवानाविनालेबलअस्वच्छ वाहनामधून वाहतूक करत असल्याचे आढळल्याने व भेसळीच्या संशयावरून जप्त केला.

 

 

याप्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी सांगितले.

 

 

मिरज येथे दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी कर्नाटक राज्यातून येणारे बस क्र. केए 29 एफ-1523मालक हाजीलाल हाजी अन्वरसाब पैलवानमे.एच.एच. पैलवानभरपेट गल्लीजमखंडीजि. बेळगावएम एच 09-एफ एल 5297 या वाहनाचे मालक रविंद्र बंडू माळीमे श्रीशिवशक्ती मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्टसइंगळीता. चिकोडीजि. बेळगाव व मे. श्रीकृष्ण दुग्धालयनरसोबाचीवाडीता. शिरोळजि. कोल्हापूर यांच्यावर छापा टाकून खवा जप्त करण्यात आला.

Rate Card

 

 

 

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्यासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. महाजनश्री. स्वामी व नमुना सहायक तानाजी कवळे यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.