दिव्यांगानी केला या जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्याचा सत्कार

0
माडग्याळ, संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग कडून विविध योजनाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य
तम्मनगौडा रविपाटील यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

रवीपाटील यांच्या प्रयत्नातून जाड्डरबोबलाद,माडग्याळ, उटगी,अंकलगीसह जिल्हा परिषद मतदार संघातील गावातील परिसरातील दिव्यांगांना पिठाची गिरण, शिलाई मशिन, शेळीपालन, झेरॉक्स मशिन अशा अनेक योजनाचा लाभ देण्यात आला आहे.जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटामध्ये शेकडो लाभार्थ्यांना योजना देण्यात आल्या आहेत.

 

 

 

या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांचा माडग्याळ येथील दिव्यांग अशोक पोतदार,अशोक सावंत, सदाशिव चौगुले, विजयकुमार माळी, महादेव जाधव, आण्णाप्पा बोगार,यांच्याकडून तम्मनगौडा रविपाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक विठ्ठल निकम,संरपच आप्पू जत्ती,उपसंरपच लक्ष्मण कोरे,रामनिंग निवर्गी, ईश्वराप्पा चनगोंड,श्री.काटे सर, सिध्देश्वर कोरे, सदाशिव माळी,विकी वाघमारे व  पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

कार्यक्रमाचे नियोजन युवक नेते कामाण्णा बंडगर, सदाशिव कोरे, सागर माळी, रशिद मुल्ला,कामदेव कोळेकर यांनी केले.
माडग्याळ ता.जत येथे तम्मणगौडा रवीपाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.