विना पासिंगच्या गाडीचा दुसऱ्यांदा अपघात…!बिरणवाडी येथील अक्षय डुबुले व रुपेश मोरे हे पट्टीचे मद्यपी होते. दारूच्या नशेत बेफाम गाडी चालवत होते. सावळजच्या श्री सिद्धेश्वर मोटार्समधून पासिंग न करता आणलेल्या गाडीचा त्यांनी चार दिवसांपूर्वी एक किरकोळ अपघात केला होता. मात्र काल या गाडीचा दुसऱ्यांदा भीषण अपघात झाला. त्यामध्ये रुपेश मोरे याचा बळी गेला.