अशुद्ध पाणी पुरवठ्याने बळावले आजार
संख : जत तालुक्यातील ग्रामीण भागात पुर्व,पश्चिम, दक्षिण व उत्तर भागातील अनेक गावात कँनॉलमधून विविध नद्याचे पाणी आले आहे.त्यामुळे पाणी पातळी वाढली आहे.या पाण्याच्या स्ञोतावर स्थानिक गावांच्या नळपाणी योजना आहेत.यात अपवाद वगळता एकाही गावात शुध्दीकरण यंत्रणा नसल्याने अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने विविध आजार बळावले आहे.
या पाण्यात ग्रामपंचायतीतर्फे ब्लिचींग पावडर टाकण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. या पाण्याचे निर्जुंतुकीकरण होत नसल्याने ग्रामस्थांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.या अशुद्ध पाणी पुरवठय़ामुळे उलट्या, गॅस्ट्रो, काविळ, टायफाईड, कॉलरासारख्या रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात गावातच शेणाचे ढिगारे लावण्यात येते. त्यातूनही अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.
यावर्षी आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात कोणतीही जनजागृती करण्यात आली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातर्फे पाणी निर्जंतुकीकरण करण्याकरिता पावडर व लिक्वीड दिले जाते. मात्र यावर्षी या पावडरचे कुठेही वाटप करण्यात आल्याचे दिसून येत नसून आरोग्य विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.