भाजप सरकारने केलेल्या महागाईची झळ लोकांच्या लक्षात आणून द्या ; ना. विश्वजीत कदम | काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात

0
सांगली  : केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आदि जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड प्रमाणात वाढवले आहेत. देशातील महत्त्वाच्या गोष्टी ते विकू लागले आहेत. त्यामुळे देशात अडचणीत आला आहे, अशा परिस्थितीत या देशाला काँग्रेस पक्षच वाचवू शकतो, त्याकरिता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन लोकांशी संवाद साधावा आणि महागाईची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असे आवाहन सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांनी आज येथे केले.

 

सांगली जिल्हा ग्रामीण आणि शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाचे सभासद नोंदणी अभियान सुरू झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ना. कदम बोलत होते. यावेळी स्वतः ना. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी स्वतःची सभासद नोंदणी करून अभियानाची सुरूवात केली.

 

यावेळी ना. कदम म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभर ओलांडून दीडशे रुपयांकडे चालले आहेत, आणि गॅसच्या किमतीही एक हजार रूपयांवर गेल्या आहेत. काँग्रेसच्या काळात उभारलेल्या अनेक गोष्टी भाजप सरकार विकू लागले आहे. देशातले सारे वातावरण यामुळे बिघडले आहे. या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.

 

Rate Card
ते म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार आजपासून संपूर्ण राज्यभर काँग्रेसची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. या नोंदणीच्या निमित्ताने नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन लोकांशी सद्य परिस्थितीवर संवाद साधावयाचा आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी  सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवायचे आहे. उमेदवार म्हणून मुलाखती होतील, त्यावेळी त्यांना सभासद नोंदणीचा अहवाल द्यावा लागेल. सभासद नोंदणीत सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला पाहिजे.

 

यावेळी पृथ्वीराज पाटील प्रास्तविक केले ते म्हणाले, पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीमध्ये सभासद नोंदणी अभियानाविषयी सूचना दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणी व्हावी. प्रत्येक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांनी हे काम करावे आणि जनतेशी संपर्क साधावा. पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचा उज्ज्वल इतिहास, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, देशासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आदी गोष्टींची अभियानात चर्चा व्हावी.

 

ह्या अभियानाला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, सांगली मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, संतोष पाटील, मयुर पाटील, अमर निंबाळकर, बिपीन कदम, महावीर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, सौरभ पाटील, अजित दोरकर, करीमभाई मेस्त्री, अजित ढोले, सनी धोतरे, अल्ताफ पेंढारी, अशोकसिंह राजपूत, भाऊसाहेब पवार, रघुनाथ घोरपडे, विठ्ठल काळे, श्रीधर बारटक्के, अण्णासाहेब कोरे, डी. एम. पाटील, आर. आर. पाटील, पवन महाजन, राजेंद्र कांबळे, योगेश जाधव, विजय आवळे, धनराज सातपुते, तौफिक शिकलगार, अमोल पाटील,  मनोज नांद्रेकर, सुनील पाटील, अजित पाटील, गोरखनाथ शेवाळे, विद्याधर यादव, सिद्धार्थ कुदळे, संजय कांबळे, विशाल कलकुटगी, सुहास पाटील, धनंजय कुलकर्णी, वसंतराव गायकवाड, महादेव देशमुख, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.