जतचे डॉ.रविंद्र आरळी भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी 

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील प्रसिद्ध स्ञी.रोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी यांची भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी  नियुक्ती राष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्यातील पहिलेच संचालक आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे डॉ.रविंद्र आरळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.     
डॉ.रविंद्र आरळी हे प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडी सेलचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.भारत सरकार केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय अंतर्गत सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालकपदी डॉ.आरळी यांची स्वतंत्र कार्यभार असलेल्या संचालक पदावर ३ वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री अवजड उद्योग डॉ.महेंद्र नाथ पांडे,केंद्रिय परिवहन मंत्री नितीन  गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांनी डॉ.रविंद्र आरळी यांना राष्ट्रीय स्तरावर कामाची संधी दिली आहे.

 

 

पंतप्रधान कार्यालयातून डॉ.रविंद्र आरळी यांची हि अभिनंदनीय नियुक्ती करण्यात आल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्याचे नाव देशाच्या यादीत आले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.