खरेदी करा मनसोक्त, पण कोरोना नियमांचे भान ठेवा

0

जत : दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या एकदम कमी झाली. प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलास मिळाला. आता दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्यातच प्रशासनाने सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत नागरिक मनसोक्त खरेदी करणार आहे.

 

गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी जत शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते.

 

 

जत शहरातील मेन लाईन मोठ्या बाजारमध्ये तर गत दोन दिवसांपासून तुफान गर्दी झाली आहे. अनेक दुकानात पाय ठेवायला जागा नाही. त्यातच आता प्रशासनाने शुक्रवारी आदेश निर्गमित करून रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि ग्राहकांना होणार आहे. परंतु खरेदी करताना सद्य:स्थितीत कुणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही.
मास्क तर बेपत्ताच झाला आहे. फिजिकल डिस्टन्सिंगही कोणी पाळत नाही. अशा स्थितीत कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.

Rate Card

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.