चोरीतील तिघा संशयिताना पकडले

0
सांगली : सांगलीत चोरीच्या संशयावरून तिघांना पोलीसांनी ताब्यात घेत ३५,९०० रूपयाची सोन्याची भोरमाळ व २०,००० हजारांची एक मोटार सायकल असा ५५,९०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

Rate Card
सौरभ राजू केळकर (वय २४,रा.आदर्श कॉलनी,सातवे मळा सांगली),कुणाल दिनकर वाले (वय १९ रा.आंबेडकर नगर,म्हाडा कॉलनी,मिरज) व एक बालअपचारी अशा तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

चांदणी चौकात बाजारपेठेत संशयास्पद फिरताना पोलीसांच्या पथकाने तिघांना पकडले होते.त्यांच्याकडे झडती घेतली असता सोन्याची बोरमाळ आढळून आली.त्याचे बिल नसल्याने व ती कोठून आणली याची समाधानकारक उत्तरे दिली नाही.सदरची बोरमाळ ही कोठूनतरी चोरून विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरिक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या पथकांने ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.