येळवीतील १४१ लाभार्थांना हक्काचे घर मिळणार

0
येळवी : येळवी ता.जत येथील १४१ लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे.शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या प्रधानमंत्री घरकूल योजनेच्या लाभार्थ्याच्या बांधकाम ठिकाणी ग्रा.प.सदस्य संतोष पाटील यांनी भेटी दिल्या.यावेळी अनेक लाभार्थ्याचे पहिला तर काही जणाचे दुसरा हप्ता जमा झालेला नाही.

 

Rate Card
बिला संदर्भातील अडचणीसाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल.कामे नियमानुसार करावीत.शासनाच्या घरकूल योजनेचा उद्देश्य प्रत्येक लाभार्थ्यांनी यशस्वी करावा.गावातील १४१ लाभार्थ्यांची पुर्ण घरांची बांधकामे होईपर्यत आम्ही त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू,असेही यावेळी पाटील यांनी सांगितले. भविष्यात उर्वरित लाभार्थांना घरकूले मंजूर करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करू असेही पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.