जत : जत शहरामध्ये स्वतंत्र महिला व पुरूष मुताऱ्या उभ्या करून महिलांना दिवाळी भाऊबीज भेट द्यावी,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.त्यांनी तसे निवेदन नगरपरिषदेला दिले आहे.
जत नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.जत शहर हे तालुक्याचे ठिकाण असून कर्नाटक राज्याच्या सीमेवरील तालुका असल्याने येथील बाजारपेठ ही प्रसिध्द आहे.
प्रमाणात गैरसोय होत आहे.समस्या सोडविण्यसाठी आम्ही २०१७ पासून वारंवार जत नगरपरिषदे कडे स्वतंत्र महिला व पुरुष स्वच्छालय उभे करण्याची मागणी करत आहोत.
तरीही नगरपरिषद प्रशासन या गंभीर मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.भारतीय संस्कृतीत दिवाळी भाऊबीजेस बहिण भावाला ओवाळून रक्षण करण्यासाठी साकडे घालते.भाऊ रक्षणाची जबाबदारी घेऊन भाऊबीज ओवाळणी देतो,त्याच पध्दतीने समस्त महिला वर्गाच्या रक्षणासाठी व आरोग्यासाठी जत नगरपरिषदीने स्वंतंत्र महिला व पुरूष स्वच्छतागृहे (मुतारी) उभ्या करून
महिला वर्गाला भाऊबीजेची भेट द्यावी.
दरम्यान जत नगरपरिषदेला यासाठी निधी नसल्यास तसे आम्हाला कळवावे आम्ही महिला वर्गाच्या रक्षणासाठी जत तालुक्यातील जागरूक नागरीक भाऊबीजची ओवाळणी म्हणून सामूहिकरित्या निधी गोळा करून जत नगरपरिषदेकडे जमा करण्यास तयार आहोत,असेही निवेदनात म्हटले आहे.