क्रुझर-दुचाकीचा भिषण अपघात | बहिण-भाऊ ठार | भाऊबीजेच्या दिवशीच ह्रदयद्रावक घटना

0
जत,संकेत टाइम्स : सोरडी- गुड्डापूर मार्गावर आज क्रुझर गाडी व दुचाकीच्या  अपघातात दरिबडची ता.जत येथील भाऊ-बहिण जागीच ठार झाल्याची भाऊबिजेच्या दिवशी दुर्देवी घटना दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

 

भाऊ अक्षय श्रीमंत चौगुले वय २०,तर बहिण काजल श्रींमत चौगुले वय १६ या मोठ्या बहिणीच्या गावाहून दरिबडची कडे येत असलेल्या या भाऊबहिणीनीवर काळाने घाला घातला आहे.
अधिक माहिती अशी, कर्नाटकातील चिक्कोडी, ता.बेळगाव येथील क्रुझर गाडी गुड्डापूर येथे देवदर्शनासाठी येत होती.

 

 

Rate Card
दरम्यान अक्षय व त्यांची बहिण काजल ही बळे ता.पंढरपूर येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबिज करून दरिबडचीकडे परतत होते.सोरडी-गुड्डापूर रस्त्यावरील दरिकोणूनर गावाजवळ क्रुझर गाडीने अक्षय व काजल यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली.धडक इतकी भयानक होती की दुचाकीसह दोघांना सुमारे ३० फुट फरफटत नेहले.या घटनेत दोघे बहिण भाऊ जागीच ठार झाले आहेत.ऐन भाऊबीजच्या दिवशीच झालेल्या घटनेने चौगुले कुंटुबियावर काळाने घाला घातला आहे.

 

 

 

मयत अक्षय यांचे दोन महिन्यापुर्वी लग्न झाले होते,तर काजल १० वीच्या वर्गात शिकत होती.घटनास्थळी चौगुले कुंटुबियाचा आक्रोश ह्रदय हेलावणारा होता.दरम्यान जत पोलीसांनी घटना स्थळी पोहचून पंचनामा करत मृत्तदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.क्रुझर गाडीच्या चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.