जतेत पॉवर टान्सफॉर्म फेल,९ फीटरचा वीज पुरवठा अनियंत्रित | महावितरणकडून पर्यायी वीज जोडणी

0
जतेत पॉवर टान्सफॉर्म फेल,९ फीटरचा वीज पुरवठा अनियंत्रित
महावितरणकडून पर्यायी वीज जोडण
जत,संकेत टाइम्स : महावितरणच्या जतच्या मुख्य विज‌ वितरण प्रणालीचा पॉवर टान्सफॉर्म फेल झाल्याने ९ फिटर बंद पडले आहेत.जत शहरासह परिसरातील विज पुरवठा अनियंत्रित झाला आहे.हा पॉवर टान्सफार्म येण्यासाठी पाच दिवस लागणार आहेत.त्यामुळे पुढील पाच दिवस जतसह परिसरातील गावांना कमी दाबाचा वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

गेल्या दोन दिवसापासून महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आसपासच्या गावातून ‌वीज पुरवठा करून गाव भागातील विज पुरवठा सुरू केले आहे. शेतीचा विज पुरवठा पुढील एक दोन दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 

Rate Card
सध्या जत आयडीसीला कुंभारीवरून,जत शहरासह पाच्छापूरहून,अचनहळ्ळी परिसरातील गावांना शेगावमधून तर रामपूरसह परिसराला डफळापूर वरून सध्या विज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.गाव भाग सुरू करण्यात आले आहेत. तर शेती पंपाचा विजपुरवठा उद्यापर्यत सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

फेल गेलेला पॉवर टान्सफॉर्म पुण्याहून शुक्रवार पर्यत जतमध्ये पोहचणार आहे.त्यांच्या जोडणीनंतर
शनिवार पर्यत वीज पुरवठा पुर्वरत सुरळीत होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.