बनाळीत ‘केशर आंबा किसान गोष्टी’ कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन

0
जत,संकेत टाइम्स : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,(आत्मा) सांगली व श्री बनशंकरी रोपवाटिका अंतराळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महादेश केशर आंबा यांच्या सहकार्याने आयोजित केशर आंबा किसान गोष्टी कार्यक्रम आज सोमवार ता.८ नोंव्हेबर २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत श्री. बनशंकरी रोपवाटिका अंतराळ येथे आयोजित केला आहे.

 

या कार्यक्रमासाठी आमदार विक्रमसिंह  सावंत,माजी सभापती सुरेश शिंदे जिल्हा कृषी अधिक्षक मनोजकुमार वेताळ,तालुका कृषी अधिकारी एच.एन.मेडिदार,पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत,माजी जि.प.सदस्य संजीवकुमार सांवत,अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजगोंडा पाटील (आंबा महर्षी) विषय : आंबा मोहोर व्यवस्थापन व श्री.सचिन नलवडे,विषय : आंबा विक्री व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

 

सोमवार दि.०८ रोजी सकाळी ११ ते २ वा. श्री बनशंकरी रोपवाटिका अंतराळ(बनाळी) येथे जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संचालक काकासो सांवत यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.