जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जत तालुक्यातून विद्यमान संचालक आमदार विक्रमसिंह सांवत व राष्ट्रवादीचे नेते तथा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.आज अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
जत तालुक्यातून जिल्हा बँकेसाठी इतके उमेदवारांनी अर्ज भरलेत की ही निवडणूक नेमकी बँकेची की पतसंस्थेची अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.
मात्र आमदार विक्रमसिंह सांवत,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,भाजपचे जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील,माजी सभापती सुरेश शिंदे,मन्सूर खतीब,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.
बँकेची निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेस,शिवसेना अशी महाआघाडी विरूध भाजपा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नेमके चित्र आज स्पष्ट होणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. जंयत पाटील,ना.विश्वजीत कदम,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या निर्णयावर निवडणूक अवलंबून आहे.जत तालुक्यातून जिल्हा बँकेसाठी कोन उमेदवार असणार यावर मोठा खल सुरू आहे.
जत तालुक्यातून कॉग्रेसकडून विद्यमान संचालक आमदार विक्रमसिंह सांवत, कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.दोघेही बँकेसाठी इच्छुक असल्याने गोच्ची झाली आहे.यामध्ये आ.सांवत हे कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने पुर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.ते काय निर्णय घेणार यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान भाजपाचे प्रबंळ दावेदार तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांचे बंन्धू उद्योजक विनोद पवार यांचा अर्ज छानणीत उडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या भाजपातून जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील मैदानात उतरू शकतात.मात्र माजी आमदार विलासराव जगताप हे काय निर्णय घेतात यावर पुढचे गणित ठरणार आहे.
तिसरीकडे राष्ट्र्वादीची तालुक्यात ताकत वाढल्याने ते जिल्हा बँकेसाठी मैदानात आहेत.राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तथा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे हे सोसायटी गटातून आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या विरोधात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सूर खतीब यांच्या नावाचीही चर्चा आहे.
भाजपा-राष्ट्रवादी आमदार सांवत यांना आवाहन देणार ?सध्या भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आमदार विक्रमसिंह सांवत यांना शह देण्यासाठी खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपा-राष्ट्रवादीकडून आमदार सांवत मैदानात उतरले तर त्यांना आवाहन देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.प्रकाश जमदाडे,तम्मणगौडा रवीपाटील यापैंकी एकजण ताकतीने उतरण्याची शक्यता आहे.