व्यावसायिक सावकारी कर्जाच्या विळख्यात | व्याजात जातो नफा : बेराजगार तरुणांपुढे मोठे संकट, अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ
जत : जत शहरासह तालुक्यातील अनेक जणाना व्यवसायासाठी बँका कर्ज देत नसल्याने शहरी व ग्रामीण अनेक लघु व्यावसायीक सावकाराच्या तावडीत सापडले असून मासिक,आठवडे,दररोज व्याज वसूली होत असल्याने नफा सावकाराच्या घशात जात आहे.कोरोनातून सावलेले व्यवसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. सावकाराच्या या जाचाने अनेकांना आता आपली दुकानदारी गुंडाळ्याचे दिसत आहे.त्यात गेल्या दोन वर्षात व्यवसायिकांना कोरोनाने पिळून काढले आहेत.

त्यात दुकानचे भाडे,कामगार पगार,घरखर्च व सावकाराचे आवाढव्य व्याज यामुळे काही व्यवसायिकांनी गाव सोडले आहे,तर काहींनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे एकादा खाजगी सावकाराच्या तगाद्याने व्यवसायिकांने आत्महत्ये सारखे पाऊल तर हेच सावकार थेट त्यांच्या कुंटबियाना गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धमकावतात.त्यामुळे अनेक वेळा असे गुन्हे दाखल होत नाहीत. परिणामी सावकार दुसऱ्या एकाद्या व्यवसायिकांची पिळवणूक करण्यास मोकळा होतो.