खंडीत वीज पुरवठ्याचा फटका,जतेत पाणी टंचाई

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरात ऐन दिवाळीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.

महावितरणचा पॉवर टान्सफॉर्म खराब झाल्याने शहरात गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.त्याचा फटका नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा यंत्रणेला बसला आहे.अगोदरचं नियोजन शून्य नगरपरिषद प्रशासनाकडून ऐन दिवाळी नागरिकांना पाणी विकत‌ घेण्याची वेळ आणली आहे.

 

शहरातील जवळपास सर्व भागात ऐन दिवाळीत पाणी सोडण्यात आलेले नाही.त्यामुळे दिवाळीसाठी आलेले नातेवाईक,व घरातील सदस्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.दिवाळीच्या उत्साहावर नगरपरिषद व महावितरणने पाणी फिरवले आहे.

 

 

दरम्यान पॉवर टान्सफॉर्म पुढील पाच दिवस बसविणे शक्य नाही.सध्या मोटारी सुरू होतील इतक्या दाबाने वीजपुरवठा सुरू नाही.महावितरणकडून पर्यायी उपाययोजना गतीने सुरू आहेत.मात्र सुरळीत वीजपुरवठा सुरू झाल्याशिवाय जत शहरात पाणी पुरवठा सुरू होणार नसल्याने आणखीन अडचणी वाढल्या आहेत.त्यामुळे पुढील एक दोन दिवस नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.