सांगली जिल्हा बँकेसाठी जतमधून चार उमेदवार | महाआघाडी विरूध भाजपा चुरशीची लढत | आ.सांवत – जमदाडे,खतीब – रवीपाटील तुल्यबंळ लढत 

0
सांगली : सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून सहकार विकास पँनेल
(महाआघाडी) विरुद्ध शेतकरी विकास पँनेल(भारतीय जनता पार्टी) अशी तुल्यबंळ लढत होणार आहे.

 

 

 

या निवडणूकीत जत तालुक्यातील चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत.सर्वात रंगतदार लढत आमदार विक्रमसिंह सांवत व त्यांच्या विरोधात दंड थोपटलेले प्रकाश जमदाडे यांच्यात होणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसमधून बाहेर पडत जमदाडे हे आ.सांवत‌ यांच्या विरोधात भाजपाकडून मैदानात उतरले आहेत.

 

 

 

दुसरीकडे इतर मागास प्रवर्ग ‌मधून राष्ट्रवादीकडून माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या विरोधात भाजपाकडून जिल्हा परिषदेचे सदस्य तम्मणगौडा रवीपाटील हे लढणार आहेत.त्यामुळे जतच्या उमेदवारांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे जत तालुक्यातील ‌सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.अर्ज‌‌ माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी तलवारी म्यान करत माघार घेतली आहे.

 

 

 

दरम्यान या निवडणुकीत शिराळा येथील राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, आणि कुंडलचे काँग्रेस नेते महेंद्र आप्पा लाड यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. तर खासदार संजय काका पाटील यांच्यासह विद्यमान 9 संचालक रिंगणाबाहेर असल्याचे स्पष्ट झाले.

 

 

 

21 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आष्टा येथील राष्ट्रवादीचे नेते वैभव शिंदे, चिमण डांगे, वाळवा तालुक्यातून सी. बी. पाटील राहुल महाडिक, महांकाली साखर कारखाना अध्यक्षा अनिता सगरे, शिराळा भाजपाचे नेते सत्यजित देशमुख आदी दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

 

 

Rate Card
जत मधून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रकाश जमदाडे यांनी बंडखोरी केली आहे. तर खासदार संजयकाका पाटील यांच्यासह विद्यमान संचालक मनोज शिंदे, सिकंदर जमादार, बी.के. पाटील, झुंजारराव शिंदे, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, उदयसिंह देशमुख, श्रद्धा चरापले, कमल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर असतील. 21 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान व 23 रोजी मतमोजणी होणार आहे. 2219 इतके मतदार आहेत.

 

 

 

 

सहकार विकास पँनेल(महाआघाडी)
सोसायटी गट : आटपाडी- तानाजी पाटील,कवठेमहांकाळ – अजितराव घोरपडे,खानापूर अनिल बाबर,पलुस- महेद्र लाड, कडेगावमोहनराव कदम, वाळवा- दिलीप पाटील,
शिराळा- मानसिंगराव नाईक, मिरज- विशाल पाटील, जत-विक्रम सावंत, तासगाव- बी.एस.पाटील.

 

महिला राखीव- जयश्री मदन पाटील,अनिता विजय सगरे,अनुसूचित जाती जमाती – बाळासाहेब होनमोरे, ओबीसी- मन्सूर खतीब,विमुक्त जाती व भटक्या जमाती-राजेंद्र डांगे, इतर सहकारी संस्था- वैभव शिंदे,प्रक्रिया संस्था-सुरेश पाटील, पतसंस्था गट- किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था-हणमंतराव देशमुख,सुनिल ताटे
शेतकरी विकास पँनेल (भाजपा)
सोसायटी गट : आटपाडी- राजेंद्र उर्फ रुस्तुमराव देशमुख,कडेगांव- तुकाराम शिंदे, वाळवा
भानुदास मोटे, मिरज – उमेश पाटील, जत- प्रकाश जमदाडे,तासगाव-सुनिल जाधव,महिला राखीव श्रीमती दिपाली पाटील, श्रीमती संगीता खोत,इतर मागासवर्गीय-तम्मणगौडा रवि, भटके विमुक्त – परशुराम नागरगोजे,अनुसूचित जाती रमेश साबळे,प्रक्रिया संस्था-सी.बी.पाटील,पतसंस्था गट- राहुल महाडीक,अजित चव्हाण,
मजूर संस्था – संग्राम देशमुख,सत्यजीत देशमुख.
खासदार पाटील यांची माघार
भाजपाचे ताकतवान नेते खा.संजयकाका पाटील यांच्यासह त्यांच्या‌ अनेक समर्थक उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने निवडणूक एकतर्पी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाकडून काही जागावर मात्र तगडे आवाहन आहे.
प्रकाश जमदाडे यांचे बंड
जत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते प्रकाश जमदाडे यांनी बंड करत आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या विरोधात भाजपाच्या पँनेलमधून उमेदवारी अर्ज दाखल करून आर्श्चर्यांचा धक्का दिला आहे.विशेष म्हणजे यावेळी प्रथमच जत तालुक्यातील चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.