संखला नेमलेल्या अधिकाऱ्यांचा उमदीतून कारभार | स्वा.शेतकरी संघटनेचे निवेदन | गुंडगिरी,अवैध धंदे वाढले

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख चौकीला नेमलेला पोलीस अधिकारी उमदी ठाण्यातून कारभार पाहत असल्याने परिसरात गुंडगिरी,अवैध धंदे,सावकारी,गांज्या,शस्ञ तस्करीसह कायदा सुव्यवस्था बिघडत आहे.

 

 

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संख चौकीला कायमस्वरूपी मुक्कामी अधिकारी नेमावा अशी मागणी,स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

संखसह परिसराचा विस्तार मोठा आहे.येथे अप्पर तहसील, महावितरणचे विभागीय कार्यालय आहे.
भविष्यात तालुका होणारे गाव म्हणून संखकडे बघितले जात आहे.

 

 

गेल्या काही दिवसात या भागात मोठ्या प्रमाणात भाईगिरी,राजकीय गुंडगिरी,मटका,जूगार,बेकायदा दारू,गांज्या असे अवैध धंदे बळावले आहेत.बोकाळलेल्या गुंडगिरीने सर्व सिमा ओंलाडल्या असून थेट पोलीसावर हल्ला करण्यापर्यत गुंडाची मजल पोहचली आहे.यामुळे सामान्य नागरिक भयभीत आहेत.

 

 

स्थानिक राजकीय गावगुंडाचाही उपद्रव वाढला आहे.या भागाची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलीस चौकी आहे.मात्र येथे नेमलेेले कर्मचारी कधी कधी तर या चौकीत उपस्थित असतात.इतरवेळी काही घटना घडली तर तब्बल २५ किलोमीटरवरील उमदी पोलीस ठाण्यात जावे लागत आहे.कोंतेबोबलाद, गिरगाव सारख्या गावातील लोकांना एकादी तक्रार द्यायची तर मोठे अंतर कापावे लागत आहे.

 

उमदी पोलीस ठाण्यातील ठिय्या मारलेल्या एका कर्मचाऱ्यांने मिळविली 1 कोटीची माया ?

त्यामुळे अनेकवेळा फिर्यादीचा जीव जाण्याचाही धोका आहे.त्यामुळे संख पोलीस चौकीचे नुतनीकरण करून येथे कायमस्वरूपी उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे.भिमाशंकर बिरादार,मल्लिकार्जुन बिरादार,राजकुमार बिरादार यांच्या सह्या आहेत.

 

 

संखात उपस्थितीला अधिकाऱ्यांचा खोडा
वरकमाईला सोकावलेले उमदी पोलीस ठाण्याचे‌ अधिकारी या चौकीला साधी भेट द्यायलाही तयार होत नसल्याचे वास्तव आहे.उमदी ठाण्यातच तळ राहिल्यास बेधडक लुट करता‌ येते असा काहीसा प्रकार सुरू आहे.पोलीस अधिकाऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी एक अनेक दिवसापासून तळ ठोकलेला कर्मचारी पुढाकार घेत असल्याची चर्चा असून त्यांच्या सांगण्यावरून अधिकारी डुलत असल्याचे आरोप होत‌ आहेत.
संख चौकीला अधिकारी नेमावा म्हणून पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.